शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कवीने सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदना मांडाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:15 IST

काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनारायण पुरी : पिंंपळगाव महविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा रंगला

पिंपळगाव बसवंत : काळानुसार भाषा बदलली; परंतु मराठी भाषेची महती कायम आहे. सामान्य माणसाची कुणाला पर्वाच दिसत नाही. त्यामुळे आजच्या कवीने सामान्य माणसांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या पाहिजेत, समाजाला अंतर्मुख केले पाहिजे, असे मत कवी नारायण पुरी यांनी व्यक्त केले.येथील मविप्र समाजाच्या क. का. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे सभापती माणिक बोरस्ते, संचालक प्रल्हाद गडाख, संचालक सचिन पिंगळे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वास मोरे, प्रतापदादा मोरे, उल्हास मोरे, प्रवीण लभडे, कवी संदीप जगताप, कैलास सलादे, गुलाब मोरे, नामदेव मोरे, अशोक मोरे, चेतन मोरे, उपप्राचार्य डी. डब्लू. दाते आदी उपस्थित होते. प्राचार्य दरेकर यांनी प्रास्ताविक केले. गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.कवी पुरी यांनी आपल्या गाजलेल्या काटा व प्रेमाचा झांगडगुत्ता या कवितांमधून देशातील सध्याच्या विदारक परिस्थितीवर कोरडे ओढले. राजकारणामुळे सामान्याची अवस्था कशी चोथ्यासारखी झाले ते मार्मीकतेने दाखवून दिले. आज जिव्हाळ्याची नाती बदलली आहेत. नात्यांमधील पावित्र्य जपले पाहिजे. तरच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. आदर्श घडला तरच अन्याय-अत्याचार थांबतील. माणूस ज्या गोष्टीची दक्षता घेत नाही त्या लुप्त होतात. त्यामुळे आपल्या भावना जपल्या पाहिजेत, असेही नारायण पुरी म्हणाले. ज्ञानोबा ढगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. बी. बी. पेखळे यांनी क्रीडा अहवाल वाचन केले. साहेबराव मोरे, ग्रंथपाल मेहंदळे यांनी पारितोषिक यादीचे वाचन केले. प्रा. शोभा डहाळे, अल्ताफ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. जे. पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक