शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमएवाय’मध्ये राज्यात नाशिक प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:19 IST

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्णाला शनिवारी (दि.१) मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्य सचिव डी. के. जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला.

ठळक मुद्देआढावा बैठकीत गौरव : जिल्हास्तरावर तीन, तर तालुक्यांना नऊ पुरस्कार

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्णाला शनिवारी (दि.१) मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्य सचिव डी. के. जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्णासह चांगले काम करणाऱ्या तालुक्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्णाला प्रधानमंत्री आवास योजनेत विविध श्रेणीत तीन, तर तालुक्यांना नऊ असे तब्बल १२ पुरस्कार मिळाले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडको भवन बेलापूर, मुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणाºया जिल्ह्णांना व तालुक्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. आॅगस्टअखेर २२ हजार १४१ घरकुल पूर्ण करून राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या व बांधकाम टक्के वारीत राज्यात द्वितीय क्रमांक असेलल्या नाशिक जिल्ह्णाला सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेत आॅगस्टअखेर ४ हजार ४०१ घरकुलांच्या योगदानाबाबतही सन्मान करण्यात आला. पूर्ण घरकुलांच्या टक्के वारीत दुसºया क्रमांकासाठी नाशिक तालुक्यास, दोन हजारांपेक्षा जास्त घरकुल पूर्ण करणाºया तालुक्यामध्ये मालेगाव, बागलाण, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मालेगाव तालुक्यास, पूर्ण घरकुलांच्या संख्येनुसार राज्यातील पहिल्या १० मध्ये असलेले जिल्ह्णातील दिंडोरी, निफाड व बागलाण या तालुक्यांमधील गट विकास अधिकाºयांना यावेळी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.देशात नाशिकचा ३८वा क्रमांकप्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, घरकुल बांधकामात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात दहा हजारांपेक्षा जास्त बांधकाम करणाºया जिल्ह्णामध्ये नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत गेल्या चार महिन्यांपूर्वी देशात २२५ क्रमांकावर असलेला नाशिक जिल्हा आता ३८व्या क्रमांकावर पोहचला आहे.