शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:19 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारे २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकनगरीत घेण्यात यावे, अशी मागणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारे २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकनगरीत घेण्यात यावे, अशी मागणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची आयोजनाची व यजमानपदाची जबाबदारी घेण्यास सावाना सक्षम आहे, अशा आशयाचे निवेदन महामंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे.सावानाच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे जाऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांची भेट घेऊन त्यांना आगामी साहित्य संमेलन ऐतिहासिक व सांस्कृतिक नाशिकनगरीत घेण्यात यावे, याबाबतचे साकडे घालण्यात आले. यासंबंधी निवेदन ढाले पाटील यांना देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले की, सार्वजनिक वाचनालय ही संस्था नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत संस्था असून, तिला १७९ वर्षांची परंपरा लाभलेली आहे. केवळ महाराष्टÑातील नव्हे तर भारतातील राजकीय, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील कलाकार मंडळींनी सावानाला भेट दिली आहे.पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. अब्दुल कलाम आदी महनीय व्यक्तींनी सावानाला भेट दिली असून, कार्याचे कौतुक केले आहे. सावानाकडे दीड लाखांच्या वर ग्रंथसंपदा असून, वाचनालयाचे सुसज्ज मुक्तदार, अभ्यासिका, सुसज्ज नाट्यगृह आणि तीन प्रशस्त सभागृह आहेत. तसेच वाचनालयातर्फे दरवर्षी ग्रंथ मेळावा, सावाना जिल्हा साहित्यिक मेळावा आदींसह विविध सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात, त्यामुळे नाशिक येथे इ.स. २०२० मध्ये अ. भा. मराठी साहित्य संमेलन घेऊन आयोजनाची जबाबदारी सावानाला द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.जागा निश्चितीसाठी नाशिकला येऊन सोयीची जागा ठरवावी, वाचनालय अपेक्षित खर्च, कार्यकर्ते, धोरण याबाबत संपूर्ण सक्षम आहेत. त्यामुळे साहित्य संमेलन नाशिक येथे भरविण्याचा आणि साहित्यिकांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यासंबंधीच्या पत्रकावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक व नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सांस्कृतिक कार्य सचिव प्रा. डॉ. वेदश्री थिगळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.अग्रक्रमाने विचार व्हावा२०२० मध्ये आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाबाबत नाशिकचा अग्रक्रमाने विचार व्हावा. यापूर्वी २००४ मध्ये नाशिक येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते. त्यात सावानाचे पदाधिकारी सक्रिय सहभागी झाले होते, असेही या संबंधीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक