शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:14 IST

जूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ

नाशिक : विल्होळी-वाडीव-हे महामार्गावर टोलनाक्याअंतर्गत असलेल्या दोन स्वच्छतागृहांची अवस्था बिकट असून, सदर स्वच्छतागृहांची जबाबदारी असलेल्या प्रगती कन्स्ट्रक्शन कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.राजूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ कनेक्शन नाही, विद्युत तारा मोकळ्या पडलेल्या आहेत. स्वच्छतागृहांची वाईट अवस्था असल्याने त्याचा वापर करायला कोणी धजावत नाही. रायगडनगर येथील स्वच्छतागृह सहा महिन्यांपासून कुलूपबंद आहे. सदर स्वच्छतागृहाची शौचालय टाकी नाशिक महानगरपालिकेची मुकणे येथून येणारी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनचे काम करणा-यांनी फोडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शौचालय कुलूपबंद आहे. तेथे असलेला सुरक्षारक्षक पगार न मिळाल्याने काम सोडून गेला. स्वच्छतागृहाची दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची भीती शेतक-यांनी बोलून दाखविली, सदर स्वच्छतागृहे टोलनाक्याच्या अंतर्गत असून महामार्गावरून येणा-या, जाणा-या वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी ते उभारण्यात आले आहेत; परंतु टोल वसूल करणारी कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी महामार्गावर प्रवासी व वाहनचालकांना प्रसंगी उघड्यावरच शौचास बसावे लागत आहे.

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गNashikनाशिक