शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:49 IST

जानोरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देअक्राळे ते विमानतळ रस्त्याला पडले मोठमोठे खड्डे

जानोरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेला होता. या रस्त्याने सप्तशृंगगड, सापुतारा तसेच गुजरात राज्यात जाणारे अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. तसेच या रस्त्याने गुजरातमधील प्रवासी शिर्डी जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने त्यांची नियमित वर्दळ असते. जानोरी, जळूऊके दिंडोरी, आंबे दिंडोरी, शिवंनई, वरवंडी येथील ग्रामस्थ दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दिंडोरी तहसील, पंचायत समिती, पोलीस स्थानक अशा अनेक शासकीय कामांसाठी येथील ग्रामस्थ या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु, या रस्त्याला दोन ते तीन फुटाचे मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तसेच गाडी चालवताना खड्डे चुकवताना अपघात होण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर बांधकाम विभागाने नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील विलास काठे, रेव्हीचंद वाघ, बाजीराव घुमरे, सोमनाथ उगले, गोटीराम वाघ, बाबुराव बोस, विलास भवर, चुनीलाल तिडके, अविनाश वाघ, विलास वाघ, भारत मोरे, पुंडलिक भवर, विश्वास घुमरे, पोपट ढिकले, माणिक घुमरे आणि शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत