शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

रसिकांनी अनुभवली नाट्यपर्वणी

By admin | Updated: October 13, 2016 00:17 IST

प्रायोगिक रंगभूमी : नाशिकच्या कलावंतांचा आविष्कार

नाशिक : नाट्यलेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे या जोडगोळीच्या प्रतिभेतून प्रायोगिक रंगभूमीवर दबदबा निर्माण केलेल्या ‘हंडाभर चांदण्या’, ‘गढीवरच्या पोरी’ आणि ‘डेटिंग विथ रेन’ या तीन नाटकांची पर्वणी रसिकांनी बुधवारी सलगपणे अनुभवली आणि नाशिकच्या कलावंतांच्या आविष्काराला उत्स्फूर्तपणे शाबासकीची थापही दिली.सोशल नेटवर्किंग फोरम आणि ट्रायसन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन नाटकांचा हा महोत्सव प. सा. नाट्यगृहात रसिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. एकमेकांहून वेगळा बाज असलेल्या या तीनही नाटकांनी सध्या प्रायोगिक रंगभूमीवर धूम चालविली असून, दबदबा निर्माण केला आहे. महोत्सवात वाट बघण्यातील व्याकुळतेतही जगण्यातील संगीत शोधत वास्तवाचे भान आणून देणारे ‘हंडाभर चांदण्या’, पाच युवतींच्या जगण्यातील वास्तव आणि स्वप्नांचे कोलाज मांडणारी विराणी ‘गढीवरच्या पोरी’ आणि हरवलेले प्रेम ते प्रेमात हरवण्यापर्यंतचा विलक्षण दिलखुलास प्रवास सांगणारे ‘डेटिंग विथ रेन’ या तीन नाटकांचे सादरीकरण झाले. या नाटकांमध्ये प्राजक्त देशमुख, मोहिनी पोतदार, प्रणव प्रभाकर, दीप्ती चंद्रात्रे, नूपुर सावजी, श्रद्धा देशपांडे, पीयूष नाशिककर, मयुरी मंडलिक, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, गीतांजली घोरपडे, सई आपटे, प्रज्ञा तोरसकर, पल्लवी पटवर्धन, प्रतीक शर्मा, धनंजय गोसावी यांनी भूमिका साकारल्या. तीनही नाटकांची निर्मिती व्यवस्था ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी व कैलास पाटील यांची होती, तर निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे व ईश्वर जगताप आहेत. नाटकाचे नेपथ्य राहुल गायकवाड, प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा- श्रद्धा-नूपुर, संगीत रोहिद सरोदे यांचे होते. तर रंगभूषा माणिक कानडे यांची होती. यावेळी सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड आणि ट्रायसनचे संचालक भूषण व रुपेश कविश्वर उपस्थित होते. (प्रतिनिधी)