शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पेठवासियांचा प्लॅस्टिकमुक्तीसाठी संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:34 IST

वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांनी विळखा घातला असून, गाव शहरांचे प्रदूषण वाढवणाºया प्लॅस्टिकवर बंदी यावी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे वासुदेवाची स्वारी फिरून या घातक वस्तूवर आळा घालण्याची हाक देत असताना दिसून येत आहे.

पेठ : वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांनी विळखा घातला असून, गाव शहरांचे प्रदूषण वाढवणाºया प्लॅस्टिकवर बंदी यावी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे वासुदेवाची स्वारी फिरून या घातक वस्तूवर आळा घालण्याची हाक देत असताना दिसून येत आहे.  पेठ येथील एकपात्री कलाकार संकेत नेवकर हे नगरपंचायत व तालुका क्षेत्रात प्लॅस्टिकमुक्ती अभियान राबवत आहेत. आठवडे बाजारात भाजीविक्रे ते व ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ते वासुदेवाचा वेश परिधान करून लोकांना प्लॅस्टिक वापरापासून विविध ओव्यांच्या माध्यमातून परावृत्त करतात. येथे कॅरिबॅग मिळत नाही व मी बाजारात जाताना कापडी पिशवी नेतो.. तुम्ही? अशा प्रकारचे संदेश देत त्यांनी जनजागृती अभियान सुरू केले आहे.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत संगमेश्वर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संकेत नेवकर यांनी तालुक्यातील वाडीवस्तीवर जाऊन एकपात्री प्रयोगातून गावकºयांचे प्रबोधन केले. यामधून त्यांनी प्लॅस्टिकपासून होणारे दुष्परिणाम, घातक आजार व पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम लोकांच्या मनात रुजवण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकही त्यांच्या ह्या अभियानाला चांगला प्रतिसाद देत असून, गावागावात त्यांच्या प्रबोधनाने नागरिकांनी प्लॅस्टिकवर बंदी आणण्याची कार्यवाही सुरू केली आहे. नगरपंचायतीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर पेठ नगरपंचायत क्षेत्रात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी अभियान राबविण्यात येत असून, यासाठी नागरिक, व्यापारी व ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी शिवकलाकार संकेत नेवकर यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आपल्या एकपात्री प्रयोगातून पेठच्या सार्वजनिक ठिकाणी, भाजीबाजार व शासकीय कार्यालयात संकेत यांनी प्रबोधनात्मक प्रयोग सादर केले. भाजी बाजारात कापडी पिशवी आणणाºया ग्राहकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकPlastic banप्लॅस्टिक बंदी