नाशिक : साधू-महंतांच्या दृष्टीने कमंडलूचे वेगळे महत्त्व आहे. साधू-महंतांकडे पितळी, तांब्याच्या धातूंचे कमंडलू दिसून येतात. कमंडलू साधूची महत्त्वाची ओळख मानली जाते. साधुग्राममध्ये प्लॅस्टिक कमंडलूची विक्री किरकोळ विक्रेत्यांकडून सुरू झाली आहे. साधुग्राममध्ये आलेले भाविक तीर्थ घेऊन जाण्यासाठी या प्लॅस्टिक कमंडलूची मागणी करतात. आठ रुपयापासून तीस रुपयांपर्यंत आकारानुसार किमती आहेत. शाहीस्रानाच्या दिवशी तीर्थ घरी नेण्यासाठी भाविक कमंडलू घेत असल्याचे विक्रेता बेबीबाई घुगे यांनी सांगितले. तसेच नव्यानेच ओम नम: शिवाय नावाचे प्लॅस्टिक कमंडलू विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यास कुंभ असेही संबोधण्यात येते. कुंभमेळ्याचे प्रतीक म्हणूनही भाविक घेतात. मात्र सध्या बच्चे कंपनीला त्यांचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे या विक्रेत्यांकडे लहान मुलांची गर्दी दिसून येते.
प्लॅस्टिक कमंडलू विक्रीसाठी दाखल
By admin | Updated: August 11, 2015 00:05 IST