शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाची निर्मिती, वापरावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:40 IST

प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बंदी घालण्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत.

नाशिक : प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बंदी घालण्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत.राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाणे गरजेचे आहे. काही वेळेस राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडा याप्रसंगी वैयक्तिकरीत्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकले जातात. हे दृश्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नाही. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हा बोधचिन्हे व नावे अधिनियम १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.

टॅग्स :NashikनाशिकPlastic banप्लॅस्टिक बंदी