सातपूर : महापालिकेच्या सातपूर व सिडको विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत बेकायदा प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे १२५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. शासनाच्या प्लास्टिकमुक्त आदेशानुसार आज महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात आली. सिडको व सातपूर विभागात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरिबॅग विक्री व वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच सुमारे १२५ किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. सदर मोहिमेत सातपूरचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, सिडकोचे विभागीय स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक भास्कर धाकराव, स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे, केतन मारू, वाजपेई, रावसाहेब मते, दुकाने निरीक्षक, अन्नसुरक्षा अधिकारी इंगळे, तसेच रवि काळे, अशोक उशिरे, राजेंद्र नेटावटे, शैलेश बागुल आदि यावेळी उपस्थित होते. यापुढेही ही मोहीम राबविण्यात येणार असून, व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन संजय गांगुर्डे यांनी केले आहे. (वार्ताहर)
महापालिकेच्या सातपूर, सिडको विभागातर्फे प्लास्टिक जप्ती मोहीम
By admin | Updated: July 29, 2016 00:59 IST