शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Plastic Ban : आदिवासी कष्टकऱ्याांचे छप्पर पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 06:35 IST

महाराष्ट्र शासनाने 23 जून पासून राज्यात केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने समाजातील अनेक घटकांवर कमी जास्त प्रमाणात बरा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत

पेठ : महाराष्ट्र शासनाने 23 जून पासून राज्यात केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने समाजातील अनेक घटकांवर कमी जास्त प्रमाणात बरा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत असून आदिवासी भागातील कष्टकरी शेतमजूरांच्या घरे शाकारणीवर याचा दुष्परिणाम झाल्याचे पिसून येते.पेठ तालुक्यात वाडी वस्तीवर बहुंताश घरे कौलारू, गवताचे व उतरत्या छपराचे असतात. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कौलातून पावसाचे तुषार येत असल्याने दरवर्षी पावसापूर्वी घरे शाकारणी करावी लागते. यामध्ये कौलांच्या व गवताच्या खालून प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन टाकून कौले किंवा गवत लावले जाते. मात्र शासनाने आता प्लॅस्टिक बंदी केल्याने आठवडे बाजारातून प्लॉास्टिक कागदांची विक्र ी कमी झाली आहे.दंडाच्या भितीने ग्राहकही खरेदी करण्यात नाखुष असल्याने आदिवासी कष्टकरी शेतमजूरांनी शासनाच्या या आवाहनाला पर्याय शोधून सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे.आदिवासी भागात अजूनही सागाची झाडे बर्यापैकी असल्याने जंगलातून मोठमोठी सागाची पाने गोळा करून त्यांचे घराच्या छप्परावर आच्छादन दिले जात आहे. तर काहींनी बंदी लागू होण्यापुर्वीच कापड खरेदी केल्याने गुपचूप कागद टाकून कौलांनी झाकून देण्याची लगबग सुरू केली आहे.विक्र ेते बाजारात दाखल23 जून पासून प्लास्टिक बंदी होणार असल्याचे सुतोवाच मिळाल्याने शुक्र वारी ( दि.22) रोजी करंजाळीच्या आठवडे बाजारात व्यापार्यांनी मोठया प्रमाणावर प्लॅस्टिक कागद, घोंगडया विक्र ीसाठी आणल्या होत्या.एकीकडे खरेदी केलेला माल मिळेल त्या भावात विक्र ी करण्याकडे व्यापार्यांचा कल असतांना दुसरीकडे शेतमंजूर व कष्टकर्यानी मात्र प्लॅस्टिक कागद खरेदी करतांना जरा हात आखडताच घेतल्याचे दिसून येत होते. बहुतांश व्यापार्यांनी दरवर्षी प्रमाणे मोठया प्रमाणावर प्लॅस्टिक कागदाची खरेदी करून ठेवल्याने आता हा साठवून ठेवलेला माल कसा विक्र ी करावा या विवंचनेत लहान मोठे व्यापारी सापडले आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी