नाशिक : सातपूर, गंगापूर परिसरातील फाशीचा डोंगर येथील वनकक्ष क्र मांक २२२ येथे पर्यावरण दिनी एक हजारांपेक्षा अधिक पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असून, त्याचे उद्घाटन नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमोल पाटील पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड, रमेश अय्यर, उमापती ओझा, सुजाता काळे, वन विभागाचे के. एम. देवरे, जी. एस. वाघ, दत्तू ढगे, सचिन चौघुले आदि उपस्थित होते. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिनकर पाटील व शेखर गायकवाड यांनी केले.
फाशीचा डोंगर येथे हजार वृक्षांची लागवड
By admin | Updated: April 30, 2015 00:12 IST