शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

दोनशे झाडांची लागवड, धुळवाडच्या सौंदर्यात घालणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 18:57 IST

सिन्नर: सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे.

ठळक मुद्देसह्याद्री युवा मंचचा पर्यावरण पूरक उपक्रम

सिन्नर : सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'वृक्ष लागवड आणि संगोपन' असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नळवाडी येथे मंचद्वारे राबवलेला हा उपक्रम यशस्वी झाला असून त्याच धर्तीवर हा उपक्रम हाती घेतला आहे.सह्याद्री युवा मंचच्यावतीने विविध प्रकारची २०० झाडे लावण्यात आली. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड झाली. भाऊसाहेब आव्हाड, मारुती आव्हाड, विष्णु आव्हाड, तानाजी आव्हाड, भिकाजी आव्हाड, अर्जुन आव्हाड, बाजीराव आव्हाड, निवृत्ती आव्हाड, मधुकर आव्हाड, प्रकाश आव्हाड, दादाहरी सांगळे, , खंडु आव्हाड, किरण आव्हाड, सागर आव्हाड , मारूती आव्हाड, सोमनाथ घुगे आदी उपस्थित होते. वृक्ष लागवडी बरोबरच त्यास संरक्षक जाळ्याही लगेचच बसवण्यात आल्या.पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून मंचद्वारे वृक्ष लागवड व त्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलली जात आहे. परिसर सुशोभित व्हावा, पर्यावरणाचा समतोल टिकावा या सामाजिक उद्देशाने मंचद्वारे विविध गावांत हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, झाडांची लागवड करून जोपासना करावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांनी केले.तीन गावांत करणार एक हजार वृक्ष लागवडधूळवाड व्यतिरिक्त दापूर, चापडगाव, देशवंडी या तीन गावांत लवकरच एक हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. मंचच्यावतीने त्याचे संगोपनही केले जाणार आहे. स्थानिक कार्यकर्ते ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. मंचद्वारे गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. तालुक्यातील आठ गावांत चार हजारावर वृक्षलागवड यापूर्वी करण्यात आली आहे. यातील 80 टक्के झाडे जगवण्यात आली आहेत.फोटो- धुळवाड येथे वृक्ष लागवड करताना सह्याद्री युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष उदय भाऊ सांगळे समवेत भाऊसाहेब आव्हाड, विष्णु आव्हाड, तानाजी आव्हाड, भिकाजी आव्हाड आदी. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरGreen Planetग्रीन प्लॅनेट