वृक्षारोपण गेले ‘खड्ड्यात’
नाशिक : शासनाच्या वतीने १ जुलै रोजी राज्यभर राबविलेल्या वृक्षारोपण मोहिमेत नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक २६ लाख रोपांची लागवड करीत राज्यात लौकिक निर्माण केला. आठ दिवसांनंतर लोकमत चमूने शहरातील वृक्षारोपण संदर्भातील वस्तूस्थिती जाणून घेतली असता वृक्षारोपणाचा फार्स दिसून आला. रोपे लागवडीचा इव्हेंट केल्यामुळे रोपे जगविण्याबाबत कोठेही काळजी घेण्यात आल्याचे दिसले नाही. केवळ फोटोपुरतीच ही मोहीम राबविण्यात आल्याचेच यावरून दिसते.