शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

प्रलंबित कृषिपंप जोडणीसाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:04 IST

पैसे भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) वीजजोडणी देण्यात येणार आहे.

नाशिक : पैसे भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) वीजजोडणी देण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत शेतक-यांसाठी असलेली ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यासाठीची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या कामांना गती देण्याच्या सूचना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिमंडळ कार्यालयात आयोजित अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या बैठकीत ब्रिजपालसिंह जनवीर यांनी योजनेबाबतची माहिती दिली. मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून होणाºया कामांचा नाशिक परिमंडळातील २९ हजार ९४१ शेतकºयांना थेट फायदा होणार आहे. तर परिसरातील इतर शेतकºयांनाही योजनेतून होणाºया कामांचा लाभ मिळेल. योजनेत एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवोल्टचे स्वतंत्र रोहित्र उभारण्यात येणार असल्याने वीजगळती व चोरीला आळा बसेल. उपलब्ध मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व उपविभागनिहाय निविदा त्वरित काढाव्यात, असे आदेश मुख्य अभियंत्यांनी दिल्या. या योजनेतून परिमंडळात जवळपास ७०० कोटी रुपयांची कामे होणार असून, एका जोडणीसाठी २ लाख ५० हजार रु पयांपर्यंतच्या खर्चाची तरतूद असून १४ वीज उपकेंद्रांची उभारणीही प्रस्तावित असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली. यावेळी नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, मालेगाव मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता दरवडे, अहमदनगर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता जीवन चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.अन्यथा कारवाईवीजबिलाची शंभर टक्के वसुली, वीजचोरी विरोधात कारवाई, थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडणे, नादुरु स्त मीटर बदलणे आदी कामे प्राधान्याने करावीत. या कामांबाबत लक्ष्य निर्धारित करून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य उपयोग करावा. या कामांमध्ये कुचराई करणाºयां-विरु द्ध कारवाई करावी, अन्यथा स्वत: कारवाईस तयार राहावे, असा इशारा मुख्य अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला.

टॅग्स :electricityवीज