ताराहाराबाद : सटाणा रस्त्यावरील गुरुकुल हौसिंग सोसायटीसमोरील रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठमोठे खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. यामुळे आतापर्यंत तीन अपघात झाले असूनही संबंधित विभागाने दुरुस्तीसाठी उपाययोजना न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.सटाण्याकडून येणाऱ्या वाहनांना वळण व उताराचा रस्ता येतो. वाहनांचा वेग जास्त असतो, त्यात वळणावर रस्त्याच्या मध्यभागी खड्डे असल्याने ते टाळने वाहनधारकास अशक्य होते. खड्ड्यांचा आकार मोठा असल्याने दुचाकीधारकांची पंचायत होते. या ठिकाणी तीन अपघात झाले असल्याने त्वरित हा खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ताराहाराबाद-सटाणा रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:26 IST