शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूररोड परिसरात ठिकठिकाणी खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:10 IST

उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे.

गंगापूर : उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे.विसे मळा, कृषिनगर, एबीबी सर्कल, आयटीआय सिग्नल ते खुटवडनगर, कृषिनगर ते शरणपूर पोलीस चौकी, संभाजी चौक, सिबल हॉटेल या परिसरातही वाहनधारकांना ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डे चुकविण्याच्या दिव्यातून जावे लागत आहे. या खड्ड्यांमधून वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, त्यांना आरोग्याच्या तक्रारीदेखील सतावू लागल्या आहेत. खड्ड्यांमध्ये वारंवार आदळत असल्याने वाहनांचेही नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्र ारी आहेत.दोनचाकी व चारचाकी वाहनांसह रिक्षावाले या रस्त्याला अक्षरश: वैतागले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते, मणक्याचा, कंबरेचा त्रास यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले. शाळेतील विद्यार्थ्यांना व वृद्ध नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शासन अजून किती जणांचा बळी गेल्यावर या रस्त्याची दुरु स्ती करेल, असा सवाल आता सामान्य नागरिकांना पडला आहे. नागरिकांना पावसामुळे चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच वाहने दामटावी लागत असून, त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. खड्डेच खड्डे चोहीकडे अशी सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांची स्थिती असून, या रस्त्यांची तत्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पावसामुळे असे समाधानकारक चित्र शहरात निर्माण झाले असले, तरी याच पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे रस्त्यांचा आणि यंत्रणेच्या कामांचा दर्जाही चव्हाट्यावर आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांमधून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर डांबरी रस्त्यांवर अर्धा ते एक फूट खोल खड्डे पडलेले असून, ते सहजासहजी निदर्शनास येत नसल्याने तेथे वाहने आदळत आहेत. त्यातूनच लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या खड्ड्यांपासून वाहनधारकांची सुटका व्हावी याकरिता महापालिकेकडून तात्पुरती मलमपट्टीही करण्यात आली. अनेक ठिकाणी खडीचा चुरा टाकण्यात आला. विटांचे तुकडे टाकूनही खड्डे बुजविण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून करण्यात आला. परंतु, ही मलमपट्टी कुचकामी ठरत असून, पुन्हा या खड्ड्यांची अवस्था जैसे थे होत आहे.रस्त्यांची झाली चाळणगंगापूररोड तसेच या भागातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी केली आहे. रस्ता खराब असल्याने येथील नागरिक आपला जीव मुठीत धरून प्रवास करतात, याठिकाणी मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेच्या शाळा असून, या रस्त्याचा त्रास त्यांनाही सहन करावा लागत आहे.रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत, नित्यनियमाने नेहमी छोट्या-मोठ्या अपघातांना नागरिकांना सामोरे जावे लागते. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरून जाताना अपघाताला सामोरे जावे लागले होते. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा