शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हातान्हात पायपीट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:41 IST

नाशिक : लॉकडाउन वाढतच चाललेले आहे. रोजगार तर नाहीच, परंतु दूरदेशी गावाकडे असलेल्या आपल्या कुटुंबीयांची चिंता. याच अगतिकतेतून पायी निघालेले मजूर आणि कामगार दररोज नाशिकमार्गे सहकुटुंब जात असून, त्यांची पायपीट अद्याप थांबलेली नाही.

नाशिक : लॉकडाउन वाढतच चाललेले आहे. रोजगार तर नाहीच, परंतु दूरदेशी गावाकडे असलेल्या आपल्या कुटुंबीयांची चिंता. याच अगतिकतेतून पायी निघालेले मजूर आणि कामगार दररोज नाशिकमार्गे सहकुटुंब जात असून, त्यांची पायपीट अद्याप थांबलेली नाही.लॉकडाउन आणि संचारबंदी झाल्यानंतरदेखील आपल्या गावाकडे निघालेल्या मजूर आणि कामगारांना सरकारने आहे त्याचठिकाणी थांबण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या तात्पुरत्या निवाराची सोय केली होती. सुरुवातीला पायी जाणाऱ्या आणि काही वेळा कंटेनर, टॅँकरमधून प्रवास करणाऱ्यांना पोलिसांनी अडवले खरे, मात्र स्थलांतरितांची एकूणच संख्या बघितली तर आता पोलीस यंत्रणेनेदेखील जणू सीमांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. नाशिकजवळच भिवंडी, कल्याण, शहापूर या भागात कारखाने आणि आॅनलाइन शॉपिंगचे गोडावून असून त्याठिकाणी असलेले शेकडो कामगार आता काम नसल्याने हवालदिल झाले आहेत. बांधकाम आणि शासकीय ठेकेदारांची कामे बंद, आॅफिसेस बंद आणि पुन्हा जिवाचे संकट अशा स्थितीत निघालेले मजूर एकदुसºयाच्या आधाराने जात आहेत. कुटुंब कबिल्याबरोबरच अत्यावश्यक सामानाचे गाठोडे बरोबर ते जात आहेत.नाशिक शहरात मुंबई-आग्रा महामार्गावरून जाताना पोलिसांनी हटकू नये यासाठी अनेक जण भर उन्हात उड्डाणपुलावरून जात आहेत. रस्त्यात मिळेल ते खाऊन आणि मुलाबाळांना देऊन तसेच पायपीट करणारे हे स्थलांतरित तसेच पुढे जातात आणि कित्येकदा पुढे झाडाच्या आणि दुकानाच्या सावलीत पहुडतात. अनेक जत्थे पुलाखालून समांतर मार्गाने पुढे जात आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांचे जत्थे अखंडपणे जात असून, काही मुंबई-आग्रा मार्गावरून पंचवटी व तेथून आडगाव मार्गे पुढे जात आहेत. तर काही जत्थे पुणे मार्गावरून जात आहेत. त्यांच्याकडील लहान मुले आणि कुटुंब बघून दररोज अनेक सेवाभावी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. रस्त्याच्या पुलाखाली विश्रांती घेणाºया या श्रमिकांना पाणी तसेच अल्पोपहार तर काही संस्था फूड पॅकेट्स देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक