शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड संघ विजेता तर ठाणे संघाला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:45 IST

देवळा : येथे झालेल्या ६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देउन गौरविण्यात आले.

देवळा : येथे झालेल्या ६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देउन गौरविण्यात आले.कर्मवीर आ. डॉ. दौलतराव अहेर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ६४ वी सिनियर महाराष्ट्र राज्य बॉल - बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धा देवळा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. तीन दिवस चाललेल्या स्पर्धत रंगतदार व चुरशीचे सामने प्रेक्षकांना बघावयास मिळाले. २५ संघ सहभागी झालेल्या या स्पर्धत चंद्रपूर, नासिक ग्रामीण, वर्धा, पुणे, रायगड, ठाणे, लातूर, पिंपरी चिंचवड या आठ संघांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीचे सामने ठाणे विरूद्ध चंद्रपूर व पिंपरी चिंचवड विरूद्ध लातूर ह्या संघात खेळला गेला. पिंपरी चिंचवड व ठाणे या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघावर मात करत विजेतेपद संपादन केले.यावेळी बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बॉल बॅटमिंटन असो. सचिव सुरेश बोंगाडे, मुंबई असो. अध्यक्ष पी. हनुमंतराव, नासिक ग्रामीण असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संभाजी अहेर, अशोक अहेर, नगरसेवक प्रदिप अहेर, प्रा.स निश बच्छाव, सुनिल भामरे आदी यावेळी उपस्थित होते. विजेत्या पिंपरी चिंचवड संघाला चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धचे आयोजन नाशिक ग्रामीण बॉल बॅटमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी नासिक ग्रामीण असो. सचिव तुषार देवरे, पवन देवरे, नितिन देवरे, इश्वर वाघ, सुनिल देवरे, प्रदिप अहेर, दिलीप गुंजाळ, सौगत दत्ता, मनिष हिंगोले,प्रा. नितिन गुंजाळ, आदिंसह नागरिक उपस्थित होते.स्पर्धत नासिक ग्रामीण व लातूर यांच्यात झालेला उपउपांत्य फेरीचा सामना सर्वाधिक वेळ चालला. खेळाडूंच्या क्षमतेची कसोटी पाहत तीन तास चाललेल्या हया सामन्यात लातूर संघाने बाजी मारली.सूत्रसंचालन ईश्वर वाघ यांनी केले. संभाजी अहेर यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Nashikनाशिक