शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी टोल कामगारांचे काळ्या फिती बांधून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:55 IST

पिंपळगाव बसवंत : सरकारने टोलनाके बंद करण्याच्या केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ पिंपळगावसह देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला.

ठळक मुद्देजोरदार घोषणाबाजी : टोलनाके बंदच्या शासन निर्णयाचा निषेध

पिंपळगाव बसवंत : सरकारने टोलनाके बंद करण्याच्या केलेल्या घोषणेच्या निषेधार्थ पिंपळगावसह देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला.शासनाची घोषणा टोल कामगारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे सरकारने डिजिटल इंडिया जरूर करावे. मात्र, ते करत असताना बेरोजगार इंडियाचा पण विचार करावा. टोल नाक्यावर (जी. पी. एस.) धोरण अवलंबत असताना कुठल्याही प्रकारे टोल कर्मचारी बेरोजगार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, यासाठी टोल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या टोल बंदच्या निर्णयाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटना सरचिटणीस अजय लोढा, कार्य अध्यक्ष रामेश्वर भावसार, सहसचिव सुधीर डांगळे, पिपळगाव उपअध्यक्ष तुषार साळवे, उपअध्यक्ष सुवर्णा बोरसे, उपअध्यक्ष मीनाक्षी गांगुर्डे, तसेच कर्मचारी रूबिना शहा, भाग्यश्री उघडे, प्रमिला चव्हाण, मुक्ता ठाकरे, कविता साबळे, रामनाथ गव्हाणे, राकेश चौधरी, भरत मांदळे, संपत कडाळे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.लाखो कामगारांची उपासमारसरकार पुढील एका वर्षात देशातील सर्व टोल प्लाजा बंद करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. टोल बंद करण्याचा अर्थ टोल प्लाजा बंद करण्याशी संबंधित आहे. सरकार अशा तांत्रिक गोष्टींवर काम करीत आहे. मात्र, यामुळे लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेच्यावतीने संपूर्ण भारतभर सरकारच्या निर्णयाविरोधात टोल नाक्यावर सर्व कामगार बांधवांनी शांततेत दिवसभर काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध नोंदविला व टोल बंदच्या निर्णयावर कडकडीत विरोध दर्शविला.डिजिटल इंडिया जरूर करावा, त्याला आमचा विरोध नाही. मात्र, टोल कर्मचारी बेरोजगार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आमचे अर्धे आयुष्य टोल नाक्यावर काम करत गेले आहे. टोल नाकाच बंद झाला तर आमच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळेल. त्यामुळे शासनाने आम्हा कर्मचाऱ्यांचा विचार करावा.- भाग्यश्री उघडे, टोल कर्मचारी, पिंपळगाव बसवंत शासनाच्या निर्णयानुसार टोल नाके संपुष्टात आले तर टोल नाक्यावर काम करणारे लाखो कामगार बेरोजगार होतील. शासनाचा डिजिटल इंडिया बेरोजगार इंडिया झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे टोल नाका बंदच्या निर्णयावर आम्ही काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला.- सुवर्णा बोरसे, महाराष्ट्र टोल कामगार संघटना, उपाध्यक्ष 

टॅग्स :tollplazaटोलनाकाStrikeसंप