पिंपळगाव बसवंत : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत पिंपळगाव शहरात ठिकठिकाणी रविवारी (दि.१९) लसीकरण पार पडले. रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास ९५ टक्के बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.या लसीकरणासाठी शहरात ४१ बूथ उभारण्यात आले होते. या बूथअंतर्गत आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा सेविकासह अंगणवाडी सेविका आदी कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहीम पार पाडली.शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही लसीकरण करण्यात आले. टोलनाक्यावर विशेष बूथ तयार केले होते. येथे आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी चेतन काळे व कर्मचाऱ्यांनी बालकांना पोलिओ डोस दिले.महादेव वाडी, अंबिकानगर भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे आरोग्यसेवक श्रीमती एस. डी बागुल, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गायकवाड, स्नेहा गायकवाड, दत्तू धाडीवाल, सचिन शेखरे, आशा सेविका सारिका बिडवे, अंगणवाडी सेविका अलका खैरनार, कल्पना चकोर, भक्ती चकोर आदींच्या हस्ते लसीकरण करण्यात आले.सर्व बालकांना पोलिओ डोस देण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन असल्याचे आरोग्य अधिकारी चेतन काळे यांनी सांगितले.
पोलिओ लसीकरणास पिंपळगाव शहरात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:15 IST