पिंपळगाव बसवंत : नाशिक येथे ॅदि. २४ रोजी होणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चासंदर्भात येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील नाक्यावरून टोल वसुल केला जाणार नाही असे उपस्थित असलेल्या टोलनाक्यावरील आधिकाऱ्यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बजावले. आधिकाऱ्यांनीही यास संमती दिली. तसेच महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी भास्करराव बनकर यांनी मोर्चाचे स्वरूप व रूपरेषेबाबत माहिती दिली. पिंपळगाव व परिसरातून लाखोच्या संख्येने या मोर्चासाठी नागरिक जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर यांनी आपल्यात मतभेद नाही हे या मोर्चात दिसून येईल. एक दिवस समाजासाठी असे समजून या मोर्चात सहभागी व्हा. मोर्चास जाण्याची व्यवस्था ठेवली असून, या दिवशी शाळा, कॉलेज बंद असणार आहेत. या मोर्चात शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने सर्वांनी त्यांची जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचेही बनकर यांनी सांगितले. यावेळी संजय मोरे, गणेश बनकर, गीतेश बनकर, भागवतबाबा बोरस्ते, बापू पाटील, सतीश मोरे, राहुल बनकर, अजय गवळी, अशोक खापरे आदिंसह परिसरातून शेकडो नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
मोर्चासाठी पिंपळगावचा नाका टोलमुक्त
By admin | Updated: September 18, 2016 23:36 IST