पिंपळगाव बसवंत : ग्रामपालिकेच्या मावळत्या उपसरपंच रुक्मिणी मोरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी अश्विनी रामकृष्ण खोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अलका बनकर व सदस्यांच्या उपस्थितीत स्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी सुरेश खोडे, विश्वास मोरे, संपत विधाते, चंद्रकांत खोडे, राजेंद्र खोडे, रामकृष्ण खोडे, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, सुहास मोरे, गणेश बनकर, रुक्मिणी मोरे, बापू कडाळे, अल्पेश पारख, किरण लभडे, सुरेश गायकवाड, नंदू गांगुर्डे, शीतल बनकर, शीतल मोरे, मालती साळवे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदी उपस्थित होते.
पिंपळगाव बसवंतच्या उपसरपंचपदी खोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:27 IST