शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक -मानसिक संयमाची कसोटी :  रवींद्रकुमार सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:16 IST

फ्रान्समध्ये झालेली जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा शारीरिक-मानसिक संयमाची कसोटी पाहणारी होती. मात्र आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव देणारा क्षण होता, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पाथर्डी फाटा येथे करण्यात आलेल्या जाहीर सत्काराप्रसंगी ते बोलत होते.

सिडको : फ्रान्समध्ये झालेली जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा शारीरिक-मानसिक संयमाची कसोटी पाहणारी होती. मात्र आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव देणारा क्षण होता, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पाथर्डी फाटा येथे करण्यात आलेल्या जाहीर सत्काराप्रसंगी ते बोलत होते.  स्पर्धा जिंकल्यानंतर नाशिकला सिंगल यांचे सोमवारी (दि.३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आगमन झाले. शहराच्या वेशीवर नाशिककरांसह पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिंगल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. यावेळी सिंगल म्हणाले, प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरु वात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण करण्यास यशस्वी ठरलो. वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अशा प्रकारच्या खडतर स्पर्धेत विजेतेपद पटकाविणे हे मोठे आव्हान होते. मात्र दैनंदिन व्यायाम, सायकलिंगची सराव असल्यामुळे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मी स्पर्धा जिंकू शकलो.यावेळी उपआयुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त बापू बांगर, शांताराम आडके, अशोक नखाते, शांताराम पाटील, मोहन ठाकूर, अजय देवरे, पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.पाथर्डी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवारात नाशिक पोलीस आयुक्तालय व तमाम नाशिककरांच्या वतीने सिंगल यांचे पोलिसांच्या बँड पथकाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सिंगल यांच्या समवेत त्यांचे वडील झिलेसिंग सिंगल, आई कांतादेवी सिंगल तसेच आयर्नमॅन स्पर्धेतील स्पर्धक त्यांची कन्या रविजासह पत्नी विनिता सिंगल यादेखील उपस्थित होत्या.

टॅग्स :ravindrakumar singhalरविंद्रकुमार सिंगलnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय