शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दीतील प्रभाग ३० मधील ९० टक्के परिसर सीसीटीव्हीच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:35 IST

महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३० चा सुमारे ९० टक्के भाग सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे.

ठळक मुद्देपरिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे उद्घाटन शेकडोंच्या संख्येने नागरिक वास्तव्यगुन्हेगारी रोखण्यास मदत होणार

इंदिरानगर : महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३० चा सुमारे ९० टक्के भाग सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील बहुतेक चौकांमध्ये भाजपप्रणीत युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने एकूण २६ कॅमेºयांची प्रभागातील हालचालीवर सूक्ष्म नजर असणार आहे.राजीवनगर टाऊनशिप परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे उद्घाटन उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. राजीवनगर टाऊनशिप परिसरात सुमारे वीस ते पंचवीस अपार्टमेंट असून, त्यामध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक वास्तव्य करीत आहेत. राजीवनगर टाऊनशिप आणि राजीवनगर झोपडपट्टीलगत असल्याने या झोपडपट्टीतील होणारा त्रास लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी संरक्षण भिंत बांधली होती. परंतु काही दिवसांनी झोपडीमधील टवाळखोरांनी संरक्षक भिंतीस भगदाड पाडून राजीवनगर टाऊनशिपमध्ये ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग तयार केला. सदर मार्गावरून व्हाइटनर गँगच्या अल्पवयीन मुलांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस वाढतच चालला होता. परिसरातील त्रस्त नागरिकांनी होणाºया त्रासाची तक्र ार नगरसेवक सतीश सोनवणे यांच्याकडे केली असता त्यांनी तातडीने स्वखर्चाने परिसरात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले त्यामुळे परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यास आणि गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी व्यासपीठावर प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये, गुरु नाथ नायडू उपस्थित होते.