शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

फुलेनगरच्या दवाखान्यात औषधांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:18 IST

महापालिकेच्या वतीने पंचवटीतील सावित्रीबाई फुले (मायको) दवाखाना व प्रसूतिगृहात अपुरा कर्मचारी वर्ग आणि असुविधांमुळे रुग्ण विशेषत: गरोदर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून गरोदर महिलांसाठी लागणाऱ्या रक्तवाढ व कॅल्शियमच्या गोळ्यांची टंचाई आहे,

नाशिक : महापालिकेच्या वतीने पंचवटीतील सावित्रीबाई फुले (मायको) दवाखाना व प्रसूतिगृहात अपुरा कर्मचारी वर्ग आणि असुविधांमुळे रुग्ण विशेषत: गरोदर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून गरोदर महिलांसाठी लागणाऱ्या रक्तवाढ व कॅल्शियमच्या गोळ्यांची टंचाई आहे, अशी तक्रार या रुग्णालयात गेल्या शनिवारी (दि.८) वॉर्ड सभेत करण्यात आला. रुग्णालयातील उपलब्ध कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करीत असले तरी दीड महिन्यांत १२ बालमृत्यू झाल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.  पंचवटीतील लोकनिर्णय सामाजिक संस्थेच्या वतीने पंचवटीतील मायको दवाखान्याच्या संदर्भात आरोग्य विषयक वॉर्डसभा संपन्न झाली. यावेळी दवाखान्याच्या डॉ. श्रीमती सांळुखे, डॉ. निकम, नगरसेवक प्रा. सरिता सोनवणे, लोकनिर्णयचे संतोष जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.२००४ साली सुरू झालेल्या या दवाखान्यात आजतागायत रुग्णाांना व कर्मचाºयांनादेखील पिण्याचे पाणी उपलब्ध नाहीत. प्रसूतीसाठी पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे वर्षाकाठी जेमतेम पन्नास प्रसुति होतात. सिझरची सोय नाही. दवाखान्यातील उपलब्ध कर्मचारी आपल्यापरीने सेवा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी वर्षभरात १४ बालमृत्यू झाल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. या रुग्णालयात स्वच्छतेसाठीदेखील शिपाई उपलब्ध नाही. येथील वैद्यकीय अधिकाºयांवर म्हसरूळ व मखमलाबाद येथील कामाचा अतिरिक्त बोजा आहे. त्यामुळे तेथे स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग चालवण्याची व्यवस्था करावी, स्थानिक रुग्णालयातदेखील पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच दीड वर्षांत विविध कारणांमुळे बारा बालमृत्यू झाले असून, त्यासंदर्भात अहवाल तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी दवाखान्यात लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून जाईल, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले तर अन्य समस्यांविषयी महासभेत पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रा. सरिता सोनवणे यांनी सांगितले. सूत्रसंचालन नंदा पवार यांनी तर स्वागत कमल मते यांनी केले. प्रास्ताविक सविता जाधव यांनी केले, तर आभार संगीता कुमावत यांनी मानले. यावेळी संतोष जाधव, पद्माकर इंगळे, वैशाली पवार, अनिल निरभवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल