शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पीएफआयचे धागेदोरे मालेगाव ते व्हाया पुण्यातून जळगावात! मोबाइल ‘वॉश आउट’ करणारा एटीएसच्या जाळ्यात

By अझहर शेख | Updated: October 22, 2022 14:43 IST

जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चौदा दिवसांची एटीएस कोठडी सुनावली.

नाशिक: राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केलेल्या ‘पीएफआय’च्या ‘त्या’ पाच सदस्यांच्या मोबाइलमधील संभाषणाचा डेटा नष्ट केल्याच्या संशयावरून जळगावातून नाशिकएटीएस पथकाने अटक केली. शनिवारी (दि.२२) त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चौदा दिवसांची एटीएस कोठडी सुनावली.

देशभरात एकाचवेळी सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेला पहाटेच्या सुमारास ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) आदेशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी हे धाडसत्र राबविले होते. या गुन्ह्याच्या तपास करताना आता पीएफआयचे धागेदोरे मालेगाव, बीड पुणेमार्गे थेट जळगावपर्यंत जाऊन पोहचले आहे.

एटीएसने जळगावातून सहावा संशयित आरोपी उनैस उमर खय्याम पटेल (३१) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाशिकच्या एटीएस कार्यालयात त्याची सलग तीनदा चौकशी करून जाबजबाब नोंदविण्यत आला. संशयिताविरुद्ध पुरावे एटीएस पथकाच्या हाती लागल्याने पटेल यास शुक्रवारी (दि.२१) रात्री सव्वा नऊ वाजता अटक करण्यात आली. त्यास शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले गेले. यावेळी सरकारपक्षाकडून विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी बाजू मांडली. यावेळी पटेलच्या बाजूनेही वकिलाने युक्तीवाद करत तीन दिवस एटीएसला त्याने पुर्ण सहकार्य तपासात केले असल्याचा दावा केला. न्यायालयाने सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत संशयित पटेल यास येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी मंजूर केली.

न्यायालयातील युक्तीवाद असा....

पटेल याने संशयितांपैकी सर्वात अगोदर पुण्याच्या अब्दुल कय्युमच्या मोबाइलमधील संभाषण नष्ट केले. यानंतर उर्वरित संशयितांचे मोबाइलमधीलदेखील संभाषण त्याने नष्ट केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्याकडून एक मोबाइल, लॅपटॉपदेखील जप्त केले आहे. त्याचीही पडताळणी करावयाची आहे. मोबाइल कंपन्यांकडून संभाषण रिकव्हर करावा लागणार असल्याने त्यास पुरेसा वेळ लागणार आहे. दरम्यान, पाचही संशयितांच्या मोबाइलमधील संवाद कोठे व कसे आणि कोणाच्या मदतीने नष्ट केले हे शोधायचे आहे. यासाठी पटेलला एटीएस कोठडी दिली जावी. त्याच्याकडून अधिक माहिती गुन्ह्याच्या तपासासाठी मिळू शकणार आहे. असा युक्तीवाद सरकारपक्षाच्या वतीने अजय मिसर यांनी न्यायालयात केला.

२६दिवसांच्या कोठडीनंतर कारागृहात!

नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८, रा. कोंढवा, पुणे), रझी अहमद खान (३१, रा. आशोका म्युज, कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) या पाच सदस्यांना बेड्या ठोकल्या होत्या. २६दिवसांची एटीएस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. सध्या त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. उनैस पटेल हा पुण्याचा संशयित वसीम उर्फ मुन्नाच्या माध्यमातून पीएफआयच्या पाच संशयितांच्या संपर्कात आला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसNashikनाशिक