शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

पाळीव प्राणी अडकतात ‘ग्लू ट्रॅप’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:11 IST

घरात घुसून उपद्रव करणाºया उंदीर, घुशी, चिचुंद्री, पाल यांसारख्या प्राण्यांना पकडण्यासाठी वापरल्या जाणाºया ‘ग्लू ट्रॅप’मध्ये पाळीव प्राणी, साप यासारखे प्राणीच मोठ्या प्रमाणात अडकत असून, लहान मुलांसाठी हे ट्रॅप धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. या ट्रॅपचा अतिरेकी वापर थांबवावा, ट्रॅप निर्मात्यांनी त्यातील ग्लूचे प्रमाण कमी करावे, लहान मुले असणाºया घरात हा ट्रॅप वापरताना सावधानता बाळगावी, अशी सूचना प्राणिमित्र संघटनेकडून देºयात आली आहे.

भाग्यश्री मुळे ।नाशिक : घरात घुसून उपद्रव करणाºया उंदीर, घुशी, चिचुंद्री, पाल यांसारख्या प्राण्यांना पकडण्यासाठी वापरल्या जाणाºया ‘ग्लू ट्रॅप’मध्ये पाळीव प्राणी, साप यासारखे प्राणीच मोठ्या प्रमाणात अडकत असून, लहान मुलांसाठी हे ट्रॅप धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. या ट्रॅपचा अतिरेकी वापर थांबवावा, ट्रॅप निर्मात्यांनी त्यातील ग्लूचे प्रमाण कमी करावे, लहान मुले असणाºया घरात हा ट्रॅप वापरताना सावधानता बाळगावी, अशी सूचना प्राणिमित्र संघटनेकडून देºयात आली आहे.  सामान्यत: घरामध्ये उंदीर, घुशी आणि पाल यासारख्या प्राण्यांचा उपद्रव होत असतो. त्यावर मात करण्यासाठी अनेक औषधे असले तरी विषारी औषध असलेले केक खाऊन हे प्राणी कोठेही येऊन पडतात. त्यावर मात म्हणून ग्लू ट्रॅपसारखा पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. अशा प्रकारच्या ट्रॅपमधून उंदीर-घुशीसारखे पाणी अडकत असले, तरी निरुपयोगी किंवा घराच्या बाहेर ठेवलेल्या या ट्रॅपमध्ये अन्य प्राणीही अडकत आहेत.  या ट्रॅपमुळे प्राण्यांची त्वचा, केस, पिसे यांना इजा होत असून, ट्रॅपमधून सुटका करून घेण्यासाठी हे प्राणी स्वत:ला ओढत असताना त्वचा ताणली जाऊन वेदना व जखमाही होत आहेत. बरेचसे प्राणी चिकटलेले अंग सोडवून घेण्यासाठी पाय चाटत आहेत. काही प्राणी झटापटीत तोंड ग्लूमध्ये घुसवून टाकत असून, त्यामुळे त्यांना श्वास घेणेही कठीण होत आहे. दीर्घकाळ असेच अडकून पडल्याने अनेकांचा मृत्यूही ओढवत आहे. या अडकलेल्या आणि वेदनेने तळमळणाºया, प्रसंगी मृत्युमुखी पडलेल्या पाळीव प्राण्यांची पॅडसह विल्हेवाट कशी लावावी, हा प्रश्न त्या घरातील सदस्यांसमोर उभा ठाकत आहे.  ग्लू ट्रॅपचे निर्माते प्राणी चिकटताच हे पॅड तसेच फेकून देण्याच्या सूचना पॅकिंगवर करत असल्याने त्या सूचनेनुसार फेकून देण्यात आलेल्या पॅडवर चिकटलेले प्राणी भूक, जखमा, वेदनांसह दीर्घकाळ कचºयात पडून राहत असल्याने अखेरीस त्यांचा मृत्यू होत आहे. हे ग्लू पॅड बनवणाºया कंपन्या स्वैराचार करत असून, त्याचा फटका निरपराध प्राण्यांना बसत आहे. अशा प्रकारे प्राण्यांची हत्या करणे म्हणजे निसर्गचक्रात हस्तक्षेप करण्यासारखे होत असून, या मृत प्राण्यांचे अवशेष मातीतून अन्नसाखळीत येत असल्याने त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम पाहायला मिळत आहे. प्रशासनाने यात लक्ष घालत नियमावली बनवावी, अशी मागणी प्राणिमित्र संघटनांकडून करण्यात येत आहे. बिनविषारी साप अडकला ट्रॅपवर तीन आठवड्यांपूर्वी गंगापूररोडवरील एका घरात उंदरांसाठी ठेवण्यात आलेल्या ग्लू ट्रॅपवर बिनविषारी साप अडकला. प्राणिमित्र संघटनेला कळविल्यावर त्यांच्या सदस्यांनी तेथे धाव घेत सापाची अथक प्रयत्नांनंतर सुटका केली. ठिकठिकाणी या ट्रॅपमध्ये उंदराऐवजी घरातील पाळीव मांजर, कुत्र्यांची पिल्ले, साप, माश्या, चिलटे, पाल, खारुताई, चिमण्या, पक्षी पॅडवर ठेवलेल्या अन्नाच्या लोभाने येऊन ग्लूमध्ये चिटकत आहेत. ग्लूच्या अतिचिकटपणामुळे या प्राण्यांची सुटका करणे बºयाचदा अवघड होत आहे. या ग्लू ट्रॅपवर उंदराऐवजी पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात चिकटत आहेत. अशा प्राण्यांची सुटका करण्यासाठी नागरिकांचे फोन येतात. घरातील अन्नधान्याची, कपड्यांची, वस्तूंची नासधूस करणाºया उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी या ट्रॅपचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. या ट्रॅपवरील ग्लूची तीव्रता अतिप्रमाणात आहे. कंपन्यांनी ते प्रमाण कमी करायला हवे. लहान मुले असणाºया घरात तर हे ट्रॅप त्यांच्या नजरेस पडणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे.- गौरव क्षत्रिय, प्राणिमित्रउंदीर, घुशींसारखे प्राणी विषारी गोळ्या वगैरे दिल्या तरी कुठेही जाऊन मृत होतात तसेच त्याची दुर्गंधी सुटत असल्याने ग्लू ट्रॅप नागरिकांना सोयीचे वाटते. घरगुती वापराबरोबरच वाहनांमध्येही या ट्रॅपचा वापर वाढला आहे. त्यामुळे वाहनांच्या वायरींचे संरक्षण होते. ग्राहकांना आम्ही ट्रॅपचा वापर रात्रीच्या वेळीच करा, घरातील पाळीव प्राणी, लहान मुले यांपासून दूर ठेवा, अधूनमधून त्याचे निरीक्षण करत राहा या सूचना आवर्जून करतो.  - तुषार नेमाडे, विक्रेताग्लू ट्रॅप वापरताना ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याबाबत आवर्जून सूचना देतो. उंदीर येतील अशाच ठिकाणी, कोपºयांमध्ये ठेवा, असेही सांगतो.  - दीपक पाटील, विक्रेता