शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपांची शौचालये सार्वजनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:39 IST

स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत शहरातील पेट्रोलपंपांवरील शौचालये आम नागरिकांसाठी खुली करून देण्याची अधिसूचना नाशिक महापालिकेने काढली असून, मनपा क्षेत्रातील सर्व पेट्रोलपंपांच्या ठिकाणी असलेल्या शौचालयांना ‘सार्वजनिक शौचालये’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर शौैचालयांचा वापर नागरिकांना विनामूल्य करून देण्याचे बंधनही महापालिकेने पंपचालकांना घातले आहे.

नाशिक : स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत शहरातील पेट्रोलपंपांवरील शौचालये आम नागरिकांसाठी खुली करून देण्याची अधिसूचना नाशिक महापालिकेने काढली असून, मनपा क्षेत्रातील सर्व पेट्रोलपंपांच्या ठिकाणी असलेल्या शौचालयांना ‘सार्वजनिक शौचालये’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर शौैचालयांचा वापर नागरिकांना विनामूल्य करून देण्याचे बंधनही महापालिकेने पंपचालकांना घातले आहे. मात्र, महापालिकेने पंपचालकांना विश्वासात न घेता लादलेल्या या निर्णयाला पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विरोध दर्शविला आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्टÑ अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबरोबरच निकषांची पूर्तता करण्याची कार्यवाहीही महापालिकेने सुरू केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने शहरातील सर्व हॉटेल्समधील स्वच्छतागृह महिलांसाठी खुली करून देण्याचा निर्णय घेतला होता. आता, शहरातील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालयांचा वापर सार्वजनिक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, तशी अधिसूचनाच जारी केली आहे. ग्राहक नसलेल्या नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध होण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये सार्वजनिक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियान अथवा स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत होणाºया उपक्रमांना आमचा अजिबात विरोध नाही. परंतु, पेट्रोलपंपचालकांना विश्वासात आणि विचारात न घेता सदर अधिसूचना काढण्यात आलेली आहे. अद्याप महापालिकेकडून आमच्यापर्यंत अधिकृत पत्र आलेले नाही. परंतु, महापालिकेच्या या निर्णयाचे अनेक धोके असून, महापालिका जर त्याबाबत जबाबदारी घेणार असेल तर आमची हरकत नाही. वास्तविक शौचालयांसाठी आम्ही ९५ टक्के पाण्याचा वापर करतो आणि सदर पाण्यासाठी आम्ही महापालिकेला व्यावसायिक दराने कर भरतो. याशिवाय पंपाच्या सुरक्षिततेचाही मुद्दा आहे. या निर्णयामुळे चालकांचे आर्थिक नुकसानही होणार आहे. महापालिकेने याबाबत पुनर्विचार करावा.  - विजय ठाकरे, वर्किंग कमिटी सदस्य, राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशन