नाशिक : शासनाकडून पेट्रोल डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतरही पेट्रोल कंपन्या ग्राहकांकडून एलबीटी म्हणजेच स्थानिक संस्था कर सुरूच असल्याने त्याच्या विरोधात पेट्रोल पंपचालक सोमवारी (दि. ७) लाक्षणिक संप पुकारणार आहेत. त्यात नाशिक आणि मालेगावमधील पेट्रोल पंपचालक सहभागी होणार आहेत.राज्य शासनाने १ आॅगस्टला एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला; मात्र ५० कोटी रुपयांवर उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाच हा कर सुरू ठेवला आहे. पेट्रोल पंपचालकांचा एलबीटी हा तेल कंपन्या भरीत असतात. साहजिकच तेल कंपन्यांकडून तो रद्द होण्याची गरज असतानादेखील कंपन्या बेकायदेशीररीत्या तो वसूल करीत आहेत. यासंदर्भात फामपेडा या पेट्रोल पंपचालकांच्या संघटनेने कंपन्यांना एलबीटी रद्द करण्यासाठी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
पेट्रोल पंपचालकांचा सोमवारी बंद
By admin | Updated: September 4, 2015 23:36 IST