शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपचालकानेच केला १६ लाख लुटीचा बहाणा; आडगाव पोलिसांनी फोडले बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:56 IST

पेट्रोल पंपचालकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखलगाव परिसरात उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे सलग तीन दिवस बँक बंद असल्याने पेट्रोल पंपावर सोळा लाख पाच हजार रुपयांची रोकड जमा झाली होती.

पंचवटी : सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे बँक बंद असल्याने मंगळवारी (दि.३) दुपारी बँकेत तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड भरण्यासाठी जाताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून रोकड असलेली बॅग लंपास केल्याचा बनाव खुद्द पेट्रोल पंपचालकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखलगाव परिसरात उघडकीस आला आहे. घटनेनंतर पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पेट्रोल पंपचालकाची कसून चौकशी केली असता रोकड लुटीचा प्रकार घडलाच नसल्याची कबुली देत स्वत:च सोळा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पत्नीकडे देऊन दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून बॅग पळवून नेल्याचा खोटा बनाव करून पोलिसांना माहिती कळविल्याचे सांगितले.याबाबत माहिती अशी की, आडगाव शिवारातील लाखलगाव परिसरात पेट्रोल पंप असून, शनिवार ते सोमवार अशा सलग तीन दिवस बँक बंद असल्याने पेट्रोल पंपावर सोळा लाख पाच हजार रुपयांची रोकड जमा झाली होती. मंगळवारी दुपारी पेट्रोल पंपमालकाने आपण बँकेत रोकड भरण्यासाठी जात असल्याचे पेट्रोल पंपावर काम करणाºया काही कर्मचाºयांना सांगितले. त्यानंतर लाखलगाव येथे गेल्यानंतर त्याने रोकड असलेली बॅग पत्नीकडे दिली व नंतर पेट्रोल पंपावर फोन करून बँकेची स्लिप विसरल्याचे सांगून एका विश्वासू कर्मचाºयाला बोलावून घेतले, त्यानंतर पुन्हा थोड्यावेळाने पेट्रोल पंपावर व आडगाव पोलीस ठाण्यात फोनवरून रोकड लुटीची माहिती कळविली.भरदिवसा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणा काहीशी हादरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पोलीस कर्मचाºयांसह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पेट्रोल पंपचालकाची चौकशी केली असता त्याने सुटीमुळे बँक बंद असल्याने बँकेत सोळा लाख पाच हजार रुपयांची रोकड जमा करण्यासाठी जात असल्याचे सांगून बँकेची स्लिप विसरल्याने रस्त्यावर थांबलो होतो, त्यातदरम्यान काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून बॅग पळविल्याचे सांगितले.सुरुवातीला पोलिसांना प्रकार काहीसा खरा वाटला, मात्र सदर प्रकाराबाबत पोलिसांनी उलटसुलट चौकशी केल्यानंतर पेट्रोल पंपचालकाचे बिंग फुटले. त्याने स्वत:च रोकड लुटीचा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले. आडगाव पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळेच सत्य बाहेर आले व पेट्रोल पंपचालकानेच कसा बनाव केला याचे पितळ उघड झाले.