नाशिक : वडाळा ििडजपीनगर कॅनाल रोडवर असलेल्या एम. एस. देवरे पेट्रोलपंपावर आलेल्या काही तरु णांनी येथील व्यवस्थापकावर पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे कारण सांगून हल्ला चढविला. तसेच अन्य काही कर्मचार्यांनाही मारहाण केल्याची घटना शनिवारी, रात्री 8 वाजेच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करत होते.बाटलीमध्ये आणलेल्या पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे सांगत तरु णांच्या टोळक्याने थेट व्यवस्थापक व कर्मचार्यांना मारहाण सुरू केली. टोळके वडाळा गाव परिसरातील असल्याचे समजते. संशियतांविरु द्ध पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.भारत सरकारच्या नियमानुसार पेट्रोलमध्ये इथेनाल मिश्रित केले जाते. इथेनॉल पाण्याकडे आकर्षित होणारे द्रव्य आहे. एवढेच नव्हे तर इथेनॉल वातावरणातील पाणी ओढुनदेखील घेते. पेट्रोल टाकीचा पाण्याशी अथवा बाहेरील हवामानासोबत संपर्क आला तर पेट्रोल व इथेनॉल वेगळे होतात. अशा वेळी चाचणीचे शास्त्रीय पर्याय ग्राहकांना उपलब्ध असतात. ग्राहकांच्या विश्वासावरच अखंड सेवा सुरू असते. हा विश्वास ग्राहकांनीही कायम ठेवावा, असे पेट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले.
पेट्रोल पंप व्यवस्थापकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:43 IST
नाशिक : वडाळा ििडजपीनगर कॅनाल रोडवर असलेल्या एम. एस. देवरे पेट्रोलपंपावर आलेल्या काही तरु णांनी येथील व्यवस्थापकावर पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे कारण सांगून हल्ला चढविला. तसेच अन्य काही कर्मचार्यांनाही मारहाण केल्याची घटना शनिवारी, रात्री 8 वाजेच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करत होते.
पेट्रोल पंप व्यवस्थापकाला मारहाण
ठळक मुद्देबाटलीमध्ये आणलेल्या पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे सांगत तरु णांच्या टोळक्याने थेट व्यवस्थापक व कर्मचार्यांना मारहाण