शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक येथील वृक्षतोडीबाबत अखेर उच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2022 11:36 IST

नाशिक मधील वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचचे  जसबीर सिंग यांच्यासह अन्य वृक्ष प्रेमींनी ही याचिका दाखल केली आहे.

नाशिक-  शहरातील दोन उड्डाणपुलांच्या नावाखाली 588 वृक्ष तोडण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून आता या प्रस्तावाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे महापालिकेत समोरील अडचणी वाढल्या आहेत.विशेष म्हणजे शुक्रवारी (दि 28) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक मध्ये येऊन अडीचशे वर्षांच्या वट वृक्षाची पाहणी करणार असताना त्याच दिवशी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नाशिक मधील वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचचे  जसबीर सिंग यांच्यासह अन्य वृक्ष प्रेमींनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य शासन, वनविभागाचे वनसंरक्षक तसेच नाशिक महापालिका, महापालिका आयुक्त कैलास जाधव, वृक्ष प्राधिकरण समिती आणि या समितीचे सर्व सदस्य शहर अभियंता  यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. नाशिक मधील वृक्षतोडी संदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यात कोणते वृक्ष तोडावे आणि कोणते तोडू नये यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत तसेच वृक्षतोडीची कार्यवाही देखील नमूद केले आहे असे असताना महापालिकेच्या वतीने मनमानी पद्धतीने शहरात वृक्षतोड सुरू असून त्यामुळे हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे मत वृक्ष प्रेमींनी व्यक्त केले आहे.

 यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी (दि 28) दुपारी बारा वाजता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार असून तशी नोटीस नाशिक महापालिकेला देण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक