शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून पेठरोडला युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:43 IST

पंचवटी : प्रेमसंबंधात अडसर ठरणाºया दिंडोरीरोडवरील दशरथ बाळू ठमके (२७) या युवकाच्या गळ्यावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार करीत चौघा संशयितांनी खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२७) उघडकीस आली़ विशेष म्हणजे संशयितांनी ठमकेचा खून केल्यानंतर मृतदेह पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता़ खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर ...

पंचवटी : प्रेमसंबंधात अडसर ठरणाºया दिंडोरीरोडवरील दशरथ बाळू ठमके (२७) या युवकाच्या गळ्यावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार करीत चौघा संशयितांनी खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२७) उघडकीस आली़ विशेष म्हणजे संशयितांनी ठमकेचा खून केल्यानंतर मृतदेह पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता़ खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पंचवटी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत चौघा संशयितांना अटक केली आहे़ ठमके हा गत शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या भावाने पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरीरोडवरील मायको परिसरातील अवधूतवाडीत (गजानन चौक) राहणारा मयत दशरथ ठमकेच्या पत्नीचे पंचवटी नागचौकातील जोशी वाड्यात राहणाºया गणेश वसंत गरड याच्यासोबत काही महिन्यांपासून अनैतिक संबंध निर्माण झाले होते. या संबंधांबाबत माहिती मिळाल्याने ठमके याने संशयित गरडला समजावूनही सांगितले होते़ संशयित गणेश गरड याने आपले सहकारी राहुल ऊर्फ भुºया बाबूराव लिलके, उमेश डॅनियल खंदारे, श्याम मधुकर बागुल यांच्या मदतीने ठमके याचा शनिवारी (दि़२१) रात्री काटा काढायचा ठरविले़  शनिवारी रात्री पार्टीच्या नावाखाली संशयितांनी ठमके यास रिक्षात बसवून पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीलगतच्या मोठ्या जलकुंभाजवळ नेल़े़ या ठिकाणी सर्वांनी मद्यपान केल्यानंतर चौघा संशयितांनी मद्याच्या नशेत असलेल्या ठमकेवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पायाला दोरी बांधून मृतदेह जवळच्या टाकीवर नेऊन पाण्यात फेकून दिला, तर आपला भाऊ दशरथ ठमके हा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती़बेपत्ता ठमकेचा तपास सुरू असताना पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना संशयित गरड व मयत ठमकेच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली़ त्यांनी पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, पोलीस उपनिरीक्षक उबाळे, हवालदार प्रवीण कोकाटे, सुरेश नरवडे, महेश साळुंखे, प्रभाकर पवार, बाळू शेळके, संदीप शेळके यांचे पथक तयार केले़ या पथकाने संशयित गरडसह चौघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता ठमकेचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकल्याची कबुली संशयितांनी दिली़ यानंतर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, आनंदा वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता टाकीत ठमकेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला़मयत ठमके मोबाइल चोरअवधुतवाडीतील गजानन चौकात राहणारा मयत दशरथ ठमकेवर पंचवटी पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल असून, खुनातील प्रमुख संशयित गणेश गरड हा पेट्रोलचोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ काही महिन्यांपूर्वीच हिरावाडीत (भगवतीनगर) पेट्रोलचोरी करताना गरड व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते़