शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेठरोडला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:13 IST

पेठरोडवरील शाहूनगर झोपडपट्टीतील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़ १७) दुपारच्या सुमारास घडली़

नाशिक : पेठरोडवरील शाहूनगर झोपडपट्टीतील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़ १७) दुपारच्या सुमारास घडली़ राजेंद्र लहानू भगत (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेच्या सुमारास राजेंद्र भगत याने घरातील लाकडास टॉवेल बांधून गळफास घेतला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़सावत्र बापाकडून विनयभंगघरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या सावत्र बापानेच विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना अंबड परिसरात घडली आहे़ पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार २९ व ३० आॅगस्ट रोजी घरात झोपलेली असताना तिच्या सावत्र बापाने विनयभंग करून अत्याचार केला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरमालकाविरुद्ध गुन्हाभाडेकरूची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकाविरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ मुरलीधर ठाकरे (६०, रा. सोनाई निवास, सटाणा नाका, मालेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घरमालकाचे नाव आहे़ ठाकरे यांचा गंगापूर रोडवरील नरसिंहनगरमधील वैशाली अपार्टमेंटमध्ये फ्लॅट असून, तो शिवाजी अहिरे यांना भाडेतत्त्वावर दिला आहे़ मात्र, याची माहिती गंगापूर पोलिसांना दिली नाही, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बागवानपुरात जुगारी अड्ड्यावर छापाबागवानपुरा परिसरात सुरू असलेल्या जुगारावर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़ १७) सायंकाळी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाºया पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ महालक्ष्मी चाळ परिसरात काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार छापा टाकला असता संशयित सिद्धांत जगताप व त्याचे चार साथीदार पत्त्याच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या संशयितांकडून ६५० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले असून, जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यूहॉटेलसमोर उभ्या असलेल्या वृद्धाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१७) सकाळी नाशिक-पुणे रोडवरील हॉटेल कामतसमोर घडली़ रामचंद्र आगादी ढगे (वय ६४, रा. भगतसिंग झोपडपट्टी, राणेनगर, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रामचंद्र ढगे हे पुणे रोडवरील हॉटेल कामतसमोर उभे असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या