शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टीक बंदीसाठी पेठ तालुका सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:00 IST

रामदास शिंदे पेठ- स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला पेठ तालुक्यात प्रारंभ झाला असून शासकिय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य, अंगणवाडी आदींनी या अभियानात सक्रि य सहभाग घेतल्याने लवकरच पेठ तालुका संपुर्ण प्लास्टिक मुक्त घोषीत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

रामदास शिंदेपेठ- स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला पेठ तालुक्यात प्रारंभ झाला असून शासकिय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य, अंगणवाडी आदींनी या अभियानात सक्रि य सहभाग घेतल्याने लवकरच पेठ तालुका संपुर्ण प्लास्टिक मुक्त घोषीत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पेठ तालुक्यात मोठी गावे वगळता वाडीवस्तीवर प्लास्टिकचा वापर तसा अभावानेच होतो.निसर्गाशी जुळवून घेतलेल्या जनतेने त्याच्या संरक्षणाचीही जबाबदारी घेतल्यास पर्यावरण रक्षणाचे मोठे काम होणार असल्याने दिनांक १ आॅगष्टपासून तालुक्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात आले आहे. यातंर्गत चार दिवसात क्षेत्रिय अधिकार्यच्या मार्फत जवळपास २०० प्राथमिक शाळांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर कचरा व प्लॅस्टिक संकलनाचे नियोजन करण्यात आले असून गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व विभागाच्या खाते प्रमुखांची संयुक्त कार्यशाळा घेण्यात आली. स्वच्छ भारत आभियान गटसाधन केंद्राकडून दिलेल्या नियोजनानुसार प्लास्टिक संकलन करण्यात येणार असून संपुर्ण प्लॅस्टिक मुक्तीची जनजागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.-----------------------जनतेसह लोकप्रतिनिधींचाही सहभागस्वच्छ सर्वेक्षण अभियानात शासकिय यंत्रणेसह लोकप्रतिनिधी, राजकिय पक्षांचे प्रतिनिधी, सरपंच व सदस्य, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समतिी अध्यक्ष व सदस्य आदींचाही सहभाग घेण्यात आला आहे. गाविनहाय समित्यांची स्थापना करून प्रथम जनजागृती, संकलन व त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने आता प्लॅस्टिक बंदीची लढाई आर या पार होणार असल्याचे दिसून येते.-----------------------स्वतंत्र अ‍ॅपची निर्मितीस्वच्छ सर्वेक्षण अभियानात सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणावर उपयोग करून घेण्यात आला असून सहभागासाठी अ‍ॅपलीकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्य जनतेसह कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी नी सदरचे अ‍ॅप डाऊनलोड करून या अभियानात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पेठ तालुक्यात जवळपास २०० गावे, ७३ ग्रामपंचायत, २३० शाळा असून गावस्तरावर विविध उपक्र म राबवून प्लॅस्टिकचे संकलन, विलीणीकरण व विद्यटनाची प्रक्रि या समजून सांगितली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक