शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पेठ : नगरपंचायत सत्ताधारी गटासह विरोधकही रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:42 IST

पेठ : नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरच्या अडीच वर्षांच्या काळात पेठ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी (जनरल) जाहीर झाल्याने ३० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, पेठ शहरातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.पेठ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने आठ जागा जिंकून सत्ता काबीज केली नंतरच्या काळात एका ...

ठळक मुद्दे पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान चार उमेदवारी अर्ज दाखल

पेठ : नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरच्या अडीच वर्षांच्या काळात पेठ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी (जनरल) जाहीर झाल्याने ३० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, पेठ शहरातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.पेठ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने आठ जागा जिंकून सत्ता काबीज केली नंतरच्या काळात एका अपक्षाने सेनेला पाठिंबा दिल्याने व नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडल्याने लता सातपुते व कुमार मोंढे यांच्या नावाची चर्चा असताना पक्षीय स्तरावर संगनमत होऊन लता सातपुते यांना पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.अडीच वर्षांच्या काळानंतर पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या असून, होणाºया निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज घोंगे व कुमार मोंढे यांनी अर्ज दाखल केले आहेत.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गौरव गावित व माकपाचे जावेद शेख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेकडे अपेक्षित संख्याबळ असले तरीही बिनविरोध निवडीच्या आशा धुसर झाल्या आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेकडे स्वीकृत सदस्यांसह ११ नगरसेवकांचे भक्कम संख्याबळ असल्याने आगामी नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार हे नक्की असताना घोंगे व मोंढे यापैकी कोणाची वर्णी लागते हे माघारीनंतरच कळेल.मनोज घोंगे यांना मागील अडीच वर्ष उपनगराध्यक्षपद दिल्याने कुमार मोंढे दावा करू शकतात तर अडीच वर्षाच्या प्रशासकीय अनुभवावर मनोज घोंगे अपेक्षा करणार असे चित्र दिसून येत आहे.उपनगराध्यक्ष निवड ३० रोजीचनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रि या पार पडल्यानंतर लगेचच त्याच दिवशी पिठासन अधिकाºयांच्या देखरेखीत उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांना माघार घेण्याची वेळ आलीच तर उपनगराध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून शिवसेना दोघांची नाराजी दूर करेल असे दिसून येते. २९ मे ला माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने पेठ शहरात विविध राजकीय हालचालींवर गरमागरम चर्चा घडून येत आहेत.