पेठ : मार्च महिन्यापासून प्रवाशांची लाडकी लालपरीची थबकलेली चाके सोमवारपासून (दि. १०) पुन्हा एकदा धावणार असून, पेठ आगारातून नाशिकसाठी दररोज तीन बसेस सोडण्यात येणार आहेत.कोरोना संसर्ग आणि झालेले लॉकडाऊन यामुळे बससेवेला पूर्णपणे ब्रेक लावण्यात आला होता. मध्यंतरी शासनाने जाहीर केलेल्या अनलॉकमध्ये पेठ तालुक्यात पेठ ते हरसूल, पेठ ते घुबडसाका, पेठ ते जाहुले या बसेस सुरू करण्यात आल्या.आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना राज्य परिवहन महामंडळाने काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पेठ आगाराला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाºया पेठ ते नाशिक दररोज तीन फेºया सुरू करण्यात येणारआहेत. पेठहून सकाळी ७.३० वा, ११.३० वा व दुपारी ४ वा बसेस सोडण्यात येणार असून, नाशिकहून पेठसाठी सकाळी ९.३० वा, दुपारी २ वा, सायंकाळी ६ वा. बसेस सोडण्यात येणार आहेत.
सोमवारपासून पेठ - नाशिक बस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:17 IST
पेठ : मार्च महिन्यापासून प्रवाशांची लाडकी लालपरीची थबकलेली चाके सोमवारपासून (दि. १०) पुन्हा एकदा धावणार असून, पेठ आगारातून नाशिकसाठी दररोज तीन बसेस सोडण्यात येणार आहेत.
सोमवारपासून पेठ - नाशिक बस धावणार
ठळक मुद्देतालुक्यात पेठ ते हरसूल, पेठ ते घुबडसाका, पेठ ते जाहुले या बसेस सुरू करण्यात आल्या.