शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

कायमस्वरूपी उपाययोेजनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2015 22:29 IST

वणी : पुराचे पाणी वसाहतीत शिरल्याने नुकसान

वणी : वणीच्या खंडेरावनगरमध्ये पुराचे पाणी शिरून या भागांतील राहिवाशांची झालेली आर्थिक हानी ही सन २००६ वर्षाप्रमाणे नदी पात्राच्या आकार मानात बदल, धोकेदायक ठिकाणी मानवनिर्मित अडथळे प्रशासकीय व्यवस्थेची गांधारीची भूमिका यामुळे खडेराव नगरातील राहिवासी ऐन पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. गुरुवार १७ सप्टेंबर रोजी तब्बल वीस तास वणी व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली १५५ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिकडे-तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली पावसामुळे अनेकांची मोठी आर्थिक हानी झाली. त्यात वणी-कळवण रस्त्यावरील खंडेरावनगर पावसाच्या तडाख्यात सापडले ७२ घरांमध्ये पाणी शिरून सुमारे पाच लाखांच्या संसार उपयोगी वस्तुंचे नुकसान झाल्याचा महसूल यंत्रणेचा अंदाज आहे. खंडेरावनगरात १२६ घरे आहेत. ५ जुलै २००६ रोजी वादळी पावसामुळे ६ जुलै 2००६ रोजी ही सर्व खंडेरावनगर पुराच्या पाण्यात बुडाले होते. त्यावेळी १२६ कुटुंबीयांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य पुराच्या तडाख्यात सापडले होते. दहा ते बारा लाख रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा तेव्हा करण्यात आला होता. प्रत्यक्षात नुकसानीची आकडेवारी जास्त असल्याची ओरड तेव्हा करण्यात आली होती. दरम्यान, नैसिर्गक विपत्तीचा सामना करताना प्रभावी उपाय योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नदीपात्रालगतची पाण्याच्या प्रवाहाला अडथळा रूप मानवनिर्मित अडथळे हटवून पूररेषा निश्चित करून संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. प्रशासकीय व्यवस्थेची डोळे झाकही काही अंशी अशा संकटांना खतपाणी घालणारी असल्याची भावना राहिवाशांच्या मनात घर करून आहे. लाखो रुपये खर्च करून घरे विकत घेणारे खंडेराववासीय आज ही मूलभूत सुविधा व सुरक्षिततेच्या विवंचनेत असल्याने या समस्यांच्या निराकरणेच्या प्रतीक्षेत खंडेराववासीय आहेत (वार्ताहर)