शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदा वाढणार मतांचा टक्का?

By धनंजय वाखारे | Updated: March 22, 2019 01:42 IST

गेल्या काही वर्षांत घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था-संघटनांमार्फत मतदार जागृती केली जात आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक :१९६७ मध्ये सर्वाधिक ६५.७९, तर २००४ मध्ये सर्वात कमी ४३.१३ टक्के मतदानाची नोंद

नाशिक : गेल्या काही वर्षांत घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था-संघटनांमार्फत मतदार जागृती केली जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी १९६७ साली नोंदविली गेली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी झालेली दुरंगी लढत एकमेव ठरली आहे. त्यावेळी, भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे बी.आर. कवडे यांनी रिपाइंचे दादासाहेब गायकवाड यांचा पराभव केला होता. मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४३.१३ टक्के मतदान २००४च्या निवडणुकीत झालेले आहे.आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघात १८ लाख ५३ हजार मतदार असून, तरुण मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या १६ लोकसभा निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघात एकदाही मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांपलीकडे गेलेली नाही. नाशिक मतदारसंघात १९५१ मध्ये झालेल्या निवडणुकीत ३ लाख ८५ हजार ८६८ मतदार होते. त्यापैकी दोन लाख पाच हजार १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी मतांची टक्केवारी ५३.१७ टक्के इतकी राहिली होती. विशेष म्हणजे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावूनही सर्वच्या सर्व मतदान वैध ठरले होते. त्यानंतर १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरून ते ४८.१३ टक्के इतके नोंदविले गेले. त्यावेळीही सर्वच्या सर्व मते वैध ठरली होती. १९६२ मध्ये ५४.१८ टक्के मतदान नोंदविले गेले तर १९६७ मध्ये झालेल्या दुरंगी सामन्यात सर्वाधिक ६५.७९ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली. तो आजतागायत विक्रम अबाधित आहे. त्यानंतर, १९७१ ते २००९ पर्यंत एकदाही मतांची टक्केवारी ६० टक्क्यांच्या पुढे सरकली नाही.सर्वात कमी मतदानाची टक्केवारी २००४ मध्ये ४३.१३ टक्के इतकी नोंदविली गेली. त्यावेळी रिंगणात नऊ उमेदवार होते. २००४ मध्ये १५ लाख २२ हजार ६६२ मतदार होते. त्यातील सहा लाख ५६ हजार ७४५ मतदारांनीच मतदान केले. म्हणजे निम्म्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला नाही. पुढे २००९ मध्ये १४ लाख ४८ हजार ४१४ मतदार होते. त्यापैकी सहा लाख ५७ हजार ८८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी ४५.४२ टक्के राहिली.मालेगाव मतदारसंघात १९६२ मध्ये सर्वाधिक नोंदजिल्ह्यातील पूर्वाश्रमीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नोंदविली गेलेली आहे. त्यावेळी तिरंगी लढत होऊन चार लाख ६२ हजार ३०५ मतदारांपैकी तीन लाख आठ हजार ६३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात दोन लाख ७१ हजार १३२ मते वैध ठरली होती. त्यानंतर मालेगाव मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद १९९६च्या निवडणुकीत नोंदविली गेली. त्यावेळी रिंगणात ९ उमेदवार होते. १० लाख ५६ हजार ७१७ मतदारांपैकी चार लाख ४० हजार ८८२ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची सर्वात टक्केवारी ४१.७२ टक्के इतकी नीचांकी राहिली. २०१४ च्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीचा आलेख उंचावला गेला. दिंडोरी ह्या नव्या रचनेत बनलेल्या मतदारसंघात ६३.४१ टक्के मतदान नोंदविले गेले.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक