शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सीए परीक्षेत नाशिकचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:07 IST

दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंट आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या मुख्य तसेच फाउंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. नव्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेनंतर सीए परीक्षेच्या निकालाचा देशभर टक्का वाढला असून, नाशिकचीदेखील टक्केवारी वाढली आहे.

नाशिक : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंट आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या मुख्य तसेच फाउंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. नव्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेनंतर सीए परीक्षेच्या निकालाचा देशभर टक्का वाढला असून, नाशिकचीदेखील टक्केवारी वाढली आहे.फाउंडेशनमध्ये नाशिकची मिताली बोथरा ही भारतात २४व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर जिंकल सुरेशभाई मवानी हीने सर्व विषयात एक्झमशन मिळविले आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या द चार्टर्ड अकाउंट (सीए) अंतिम परीक्षा आणि सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. सीए अंतिम परीक्षा (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) तसेच सीपीटी फाउंडेशनसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.नाशिकमधून सीए ओमप्रकाश जाजू यांचा मुलगा सत्यम जाजू, सीए विवेक राठी यांची कन्या मानसी राठी, सीए संजीव मुथा यांची कन्या सलोनी मुथा तसेच विशाखा संकलेचा, शुभम चोरडिया, चंदना कांकरिया, प्रतीक राठी, ऋतुजा अमृतकर यांनी सीए परीक्षा उतीर्ण केली आहे. तसेच प्रदिप जोशी, जयेश मालपुरे, शुभम चोरडीया , शुभम बच्छाव, यश शहा, अश्विनी ढवळे, सत्यम जाजू हे देखील उत्तीर्ण झाले आहे. नाशिक निकाल यंदा सकारत्मक असून मागील वर्षीच्या तुलणेत टक्केवारी वाढली असल्याचे कोचिंग क्लासेस असोसिएशनचे सेक्रेटरी सीए लोकेश पारख यांनी सांगितले. यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे ही दिसून आले. नाशिकसाठी यंदाचा निकाल प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया नाशिक सीए असोसीशनचे अध्यक्ष मिलन लुनावत यांनी व्यक्त केली.लक्षवेधी वाढसीए फायनलच्या नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या उत्तीर्ण निकालात मे २०१८ च्या निकालाच्या तुलनेत लक्षवेधी वाढ झाली आहे. जुन्या अभ्यासक्र माच्या परीक्षेत ग्रुप १ मध्ये एकूण ३०.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते; यात यंदाच्या निकालात १४.३४ ने वाढ झाली आहे. ग्रुप २च्या निकालात मे मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत १३.५९ टक्के निकाल होता तर नोव्हेंबर २०१८ च्या परीक्षेचा निकाल ग्रुप २ साठी २३.४१ टक्के आहे. दोघाही ग्रुपची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल १५.०३ टक्के आहे. मे २०१८ मध्ये झालेल्या दोन्हीही ग्रुपच्या एकत्रित परीक्षेचा निकाल ९,०९ टक्के होता.आदित्य गुजराथी देशात ४१वानाशिकरोड येथील आदित्य गुजराथी सीए अंतिम परीक्षेत देशात ४१वा आला आहे. कुटुंबात सीए कुणीही नसताना गुजराथी याने मोठ्या परिश्रमाने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.सीएच्या जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन्ही गु्रप उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३८३ इतकी असून, निकालाची टक्केवारी १५.०३ टक्के इतकी आहे.  फाउंडेशन परीक्षेसाठी २७,७२४ मुले प्रविष्ट झाले होते त्यापैकी ११९३५ मुले उतीर्ण झाले तर निकालाची टक्केवारी ४३.०३ इतकी आहे.मुलींमध्ये २०,९६८ प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ९५५३ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेची टक्केवारी ४५.५६ इतकी आहे.

टॅग्स :chartered accountantसीएNashikनाशिक