शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

येवला शहरात राष्टÑवादीचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:44 IST

येवला : राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच येवल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि भुजबळ समर्थकांनी एकच जल्लोष केलाशेर हे भाई शेर है.. भुजबळही शेर है,

येवला : राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच येवल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. गैरकारभाराच्या आरोपांवरून भुजबळांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ९ वेळा जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते; मात्र त्यांना यश येत नव्हतं. शुक्रवारी त्यांना जामीन मिळाल्याची वार्ता येवल्यात धडकताच शहर व ग्रामीण भागात समर्थकांनी दिवाळी साजरी केली. जामीन मिळाल्याची बातमी येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि भुजबळ समर्थकांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. गेली दोन वर्ष आम्ही या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज आला अशी प्रतिक्रि या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विंचूर चौफुलीवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. फटाक्यांची आतषबाजी करत डीजेच्या तालावर ठेका धरला. भुजबळ यांच्या जल्लोषात सुमारे दोन तास येवला-विंचूर चौफुलीवर रहदारी थांबली होती. शेर हे भाई शेर है.. भुजबळही शेर है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिला कार्यकर्त्यांनीदेखील फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. भरउन्हात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विंचूर चौफुलीवर पेढे वाटले. भुजबळ संपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे, बी.आर. लोंढे, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, अरुण थोरात, संजय बनकर, प्रदीप सोनवणे, दीपक लोणारी, भूषण लाघवे, हरिभाऊ जगताप, मोहन शेलार, नवनाथ काळे, भाऊसाहेब कळसकर, बाळासाहेब गुंड, प्रवीण बनकर, सुनील पैठणकर, विष्णू कºहेकर, मुशरीफ शाह, सचिन सोनवणे, अविनाश कुक्कर, दत्ता निकम, प्रवीण पहिलवान, उषाताई शिंदे, शामा श्रीश्रीमाळ, भारती येवले, राजश्री पहिलवान, सचिन कळमकर, भागवत सोनवणे, विजय खोकले, भाऊसाहेब कळसकर, रवि जगताप, डॉ. संकेत शिंदे, निसार निंबूवाले, प्रशांत शिंदे, रश्मीताई पालवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.गंगादरवाजा परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. पेढे वाटण्यात आले. यावेळी सुभाष गांगुर्डे, बाळासाहेब कापसे, गोटू मांजरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. येवल्याच्या थांबलेला विकास परत एकदा सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया येवल्यात उमटली.