शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी विश्वासघात केला की, ईव्हीएमने दगा दिला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:56 IST

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कोकाटे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले संपूर्ण निवडणूक प्रचारात आपल्याला कोठेही ‘पेड’ प्रचार करावा लागला नाही, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध समाजघटकांकडून मिळणारा पाठिंबा व स्वखर्चाने हितचिंतकांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देमाणिकराव कोकाटे : लोकसभा निवडणुकीचा निकाल अमान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभेची उमेदवारी करण्यापूर्वी प्रत्येक समाजाच्या घटकाशी चर्चा केली, नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतकांनी उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला व राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारापेक्षाही पहिल्या दिवसापासून आपण प्रचारात आघाडी घेतल्यामुळे आपली उमेदवारी शेवटपर्यंत चर्चेत राहिली. परंतु प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी मिळालेली मते पाहता, ज्या मतदारांच्या भरवशावर आपण उमेदवारी केली. त्यांनी आपला विश्वासघात केला की, देशभर ज्या ईव्हीएमबाबत संशय घेतला जात आहे, त्याने दगा दिला? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही, अशी भावना व्यक्त करून माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल मान्य करण्यास नकार दिला. मात्र असे असले तरी, सिन्नर विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कोकाटे यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले संपूर्ण निवडणूक प्रचारात आपल्याला कोठेही ‘पेड’ प्रचार करावा लागला नाही, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध समाजघटकांकडून मिळणारा पाठिंबा व स्वखर्चाने हितचिंतकांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला एक लाख ३५ हजार मते मिळाली असली तरी, केलेल्या प्रयत्नांपेक्षाही ती कमी आहेत. ती कमी का झाली? या प्रश्नाचे उत्तर आपण पहिल्या दिवसांपासून शोधत आहोत. त्याचे उत्तर अद्याप मिळालेले नसल्यामुळे लोकसभेचा निकाल मान्य करण्यास मन तयार होत नसल्याचे कोकाटे यांनी सांगितले. राज्यात व देशात सरकारच्या विरोधात अ‍ॅण्टी इन्कबन्सी असताना निवडणुकीत मते घटण्याऐवजी त्यात वाढ झाल्याचा निकाल धक्कादायक व संशय घेण्याजोगा आहे. आपण स्वत: तीन वेळा आमदार असताना जनतेची कामे करूनही प्रत्येक निवडणुकीत आपले मताधिक्क्य घटत गेले ही वस्तुस्थिती आहे, अशा परिस्थितीत विद्यमान उमेदवाराचे मताधिक्क्य कसे वाढू शकते, असा प्रश्नही कोकाटे यांनी केला. सन २०१४ मध्ये केंद्रात भाजपाला सत्ता आल्यानंतर देशभर जो उत्साह दिसला तो यावेळी भाजपाच्या जागा वाढूनही का दिसला नाही, असा सवाल करून देशपातळीवर ईव्हीएमबाबत संभ्रम व संशय घेतला जात असल्यामुळे आता सरकारही स्थिरस्थावर झाल्याने त्यांनी देशभरातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी या सर्व बाबींची चौकशी करावी व जनभावनेचा विचार करून यापुढील निवडणुका बॅलेट पेपरने घ्याव्यात, अशी मागणी करून कोकाटे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघात बॅलेट पेपरने मतदान घेतले जावे, त्यासाठी येणारा अतिरिक्त खर्च आपण उचलण्यास तयार असल्याचेही सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे उपस्थित होत्या.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक