शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

सामूहिक वनहक्कांचे दावे प्रलंबित

By admin | Updated: June 12, 2014 00:44 IST

१३ प्रकारच्या विविध दाव्यांच्या माध्यमातून एक हेक्टरपर्यंत उपलब्ध होऊ शकतात, तसे दावे तत्काळ पाठवावेत, असे आवाहन राजभवन येथील उपसचिव परिमल सिंह यांनी केले.

 

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून वनहक्क दावेसंदर्भात वैयक्तिक दावे मोठ्या प्रमाणात निकाली निघाले असून, त्या मानाने सामूहिक वन हक्कांचे दावे मात्र मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत. त्यामुळे सार्वजनिक कामांसाठी आवश्यक असलेल्या वनजमिनी १३ प्रकारच्या विविध दाव्यांच्या माध्यमातून एक हेक्टरपर्यंत उपलब्ध होऊ शकतात, तसे दावे तत्काळ पाठवावेत, असे आवाहन राजभवन येथील उपसचिव परिमल सिंह यांनी केले.आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ सामूहिक वनहक्क कायम करणे कार्यपद्धती याविषयी १५ जिल्ह्यांतील ६० गटविकास अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन परिमल सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. उपसचिव परिमल सिंह यांनी वनहक्क दावे व पेसा कायद्यासंदर्भात उपस्थिताना मार्गदर्शन केले. वनहक्क कायदा २००६ झाला मात्र, त्यात सुधारणा २००८ रोजी व नियम २०१२ रोजी तयार झाले. वैयक्तिक व सामूहिक वनजमिनी हक्क दावे प्रामुख्याने या कायद्यान्वये सोडविण्यात आले. त्यात सामूहिक दावे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याचे सिंह यांनी सांगितले. त्यातही असे सामूहिक दावे निकाली काढण्यासाठी अस्तित्वात असलेल्या वनहक्क समित्यांनी दावे तत्काळ सादर करणे आवश्यक आहे. त्यात १३ प्रकारच्या गावांच्या विविध प्रकारच्या मूलभूत सुविधांसाठी एक हेक्टरपर्यंत जमिनी उपलब्ध होऊ शकतात. त्यात शाळा, दवाखाने, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकान, वीज व दूरसंचार तारा, तलाव, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लघुजलसिंचन वितरिका, अपारंपरिक ऊर्जा संसाधने, व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, रस्ते, पायाभूत सुविधा केंद्र यासाठी जमीन उपलब्ध होऊ शकते. त्याचप्रमाणे कार्यशाळेत सेवानिवृत्त सहायक व संरक्षक राजेंद्र धोेंगडे, कुर्खेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. आर. धनकर, डहाणूचे उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन, पंतप्रधान ग्रामविकास निधीचे समन्वयक महेश राऊत आदिंनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)