शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

केरकचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:41 IST

महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) केली. यावेळी नाल्यांमध्ये केरकचरा टाकणे, सांडपाणी सोडणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी आरोग्याधिकाºयांना दिले.

नाशिक : महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) केली. यावेळी नाल्यांमध्ये केरकचरा टाकणे, सांडपाणी सोडणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी आरोग्याधिकाºयांना दिले.  शहरातील सहाही विभागात सुमारे २५ कि.मी. लांबीचे ६५ नाले आहेत. सध्या महापालिकेच्या वतीने नाल्यांसह पावसाळी चेंबर, ड्रेनेजचे चेंबर यांची साफसफाई सुरू आहे. या कामांची पाहणी आयुक्तांनी केली. यावेळी पूर्व विभागातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील नाला, रविशंकर मार्गावरील नाल्याची पाहणी करून त्यांनी नाल्यातील मटेरियल  पूर्ण उचलून नाल्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यालगतचे चेंबर्स, कॅच पिट स्वच्छ ठेवणे तसेच रस्त्यालगतची माती उचलून घेण्याचे आदेश आरोग्य विभागास देण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी नाशिकरोड विभागात जाऊन वास्तू पार्क, औटे मळा, जयभवानीरोड आणि सुभाषरोड येथील नाल्यांची पाहणी करून नाले पूर्ण रुं दीपर्यंत व पूर्ण खोलीपर्यंत साफ करून मटेरियल उचलून घेण्याच्या सूचना दिल्या, तसेच नाल्यात केरकचरा टाकणे व सांडपाणी सोडणाºयांवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य अधिकाºयांना दिले. पंचवटी विभागात नांदूर नाका येथील चेंबर्सजवळील व रस्त्याच्या फॅनिंगमधील माती उचलून घेणे, नाले पूर्ण रुंदीचे साफ करून सीडीवर्क जवळ रस्त्याचे पाणी नाल्यात जाण्याकरता योग्य चाºया करणे, गुंजाळ मळारोड साईड गटार एक ते दीड मीटर रुं द व खोल करणे, वाघाडी नदीमधील मटेरियल उचलून पाण्याला जास्तीत जास्त मार्ग मोकळा करणे आदी सूचनाही आयुक्तांनी दिल्या. सदर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेशित करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका