नाशिक : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला क्रे नने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वडाळा नाक्यावरील सादीकनगरमध्ये राहणारे इम्तियाज मेहमूद पठाण हे शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हॉटेल साई मुस्कानसमोरील रस्ता ओलांडत होते़ यावेळी भरधाव आलेल्या क्रेनने (एमएच १५, आर ८४१८) इम्तियाज मेहमूद पठाण यांना जोरदार धडक दिली़ या धडकेत त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी माजिद मेहमूद पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार क्रेनचालकावर भद्रकाली पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भद्रकाली पोलीस अधिक तपास करीत आहेत. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. (प्रतिनिधी)