शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

मनपाची देयके ‘एसएमएस’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:36 IST

घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके वेळेवर येत नसल्याची तक्रार करून अनेक करदाते वेळेत कर भरत नाही, त्यांची अचडण दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या देयक रकमांची माहिती संबंधित करदात्याला एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे.

नाशिक : घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके वेळेवर येत नसल्याची तक्रार करून अनेक करदाते वेळेत कर भरत नाही, त्यांची अचडण दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या देयक रकमांची माहिती संबंधित करदात्याला एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल, परंतु त्याबरोबर देयकाची प्रत हाती पडली नव्हती असे म्हणण्यास जागाच राहणार नाही.  नाशिक महापालिकेत सध्या करवाढीचा मुद्दा ऐरणीवर आहे. महापालिकेला पुरेसे उत्पन्न नाही आणि दुसरीकडे मात्र कामांची अपेक्षा वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर कर चुकवेगिरीला माहिती मिळू नये यासाठी आता नवीन यंत्रणा उभारण्यात येणार आहेत. सध्या महापालिकेचे पाणीपट्टीचे उद्दिष्ट ६० कोटी असून, घरपट्टीचे उद्दिष्ट २६० कोटी रुपये इतके आहेत. त्यातही दोन्ही कामांसाठी १२० कर्मचारी सामाईक असून, त्यांच्यावर ताण पडत असतो.  एकदा पाणीपट्टीसाठी रिडिंग घेतल्यानंतर पुन्हा त्याची देयके देण्यास बऱ्याचदा विलंब होतो. पाणीपट्टीची देयके त्रैमासिक, तर घरपट्टीची अर्धवार्षिक असतात.  परंतु देयके देण्यास विलंब झाला तर हेच निमित्त ठरते आणि कर थकबाकीदार वाढत जातात. या पार्श्वभूमीवर आता एसएमएसद्वारेच करदात्यांना त्यांच्या देयकाची रक्कम देण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या महापालिकेच्या वतीने कर्मचारी घरोघर जाऊन पाणीपट्टीसाठी मीटर रिडिंग घेत असून, त्याचवेळी ज्यांच्या नावावर मिळकत आहेत, त्यांचे मोबाइल क्रमांक संकलित केले जात आहेत. त्यानंतर त्यावरच आता महावितरण किंवा बीएसएनएलच्या धर्तीवर देयकांची संक्षिप्त माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे संंबंधित करदात्याला माहिती आता एसएमएसद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.फुकट्यांना बसणार दणकामहापालिका हद्दीत १ लाख ९३ हजार वीजमीटर असून, त्यातील ७० टक्के मीटर बंद असल्याने त्यांना सरासरी देयके दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर यंदा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंदमीटरच्या सरासरी देयकात वाढ केली असून, त्यामुळे फुकट्यांना दणका बसणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका