शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

वीज लोकअदालतीत ७६ लाखांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:40 AM

खंडित वीजपुरवठा, वीजचोरी तसेच न्यायालयात विविध कारणांनी दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ग्राहकांना तडजोडीची संधी मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत १०७२ ग्राहकांनी ७६ लाखांचा भरणा केला आहे.

नाशिक : खंडित वीजपुरवठा, वीजचोरी तसेच न्यायालयात विविध कारणांनी दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ग्राहकांना तडजोडीची संधी मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत १०७२ ग्राहकांनी ७६ लाखांचा भरणा केला आहे.शनिवारी (दि.१४) नाशिक व नगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये ७६ लाख ८६ हजार रु पयांचा भरणा करून सदर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले व वीजचोरी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. मालेगाव मंडळातील ३७८ दाव्यांमध्ये ग्राहकांनी तडजोड करीत ३० लाख ९६ हजाराचा भरणा केला. नाशिक शहर मंडळातील ४६ दाव्यामध्ये ५ लाख ८९ हजार भरणा केला, तर अहमदनगर मंडळाने ६४८ दाव्यांमध्ये ४० लाख १ हजार रुपयांचा भरणा अशी एकूण १०७२ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली.लोकअदालतीमध्ये विनाविलंब न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच परस्पर समन्वयासाठी सदर लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते प्रवीण दरोली, रमेश सानप आणि संतोष सांगळे, वरिष्ठ व्यवस्थापक डी. आर. मंडलिक, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, बाळासाहेब कराड, व्यवस्थापक किरण बिरारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.न्यायालयाचे मार्गदर्शनसदर लोकअदालतीसाठी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश आर. एम. जोशी, मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एच. मोहम्मद, अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. एल. अणेकर, निफाड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी. वाघमारे, पी. डी. डिग्रसकर व एस. टी. डोके तसेच नाशिक व अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. पी. कुलकर्णी व एस. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक