नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या जुना आग्रारोडरोडवरील मुख्य शाखेत अज्ञात व्यक्तीने १७ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटा भरल्याचे समोर आले आहे़ स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेत दररोज लाखो रुपयांचा भरणा होत असतो़ यावेळी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवत बँकेत जमा केल्या़ या बँकेमध्ये जीर्ण झालेल्या नोटाही बदलून दिल्या जातात, त्यातही काहींनी या बनावट नोटा दिल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे़ १० जून २०१३ ते १६ सप्टेंबर २०१३, १२ आॅगस्ट २०१४ या कालावधीत बँकेमध्ये १७ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा झाला आहे़ त्यामध्ये १०० रुपयांच्या २४, ५०० रुपयांच्या २१, तर एक हजार रुपयांच्या पाच नोटांचा यामध्ये समावेश आहे़ याप्रकरणी बँकेच्या रोखपालांनी दिलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
स्टेट बँकेत बनावट नोटांचा भरणा
By admin | Updated: January 18, 2015 01:08 IST