शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एनडीसी बँकेतील खातेदारांचे पैसे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:49 IST

सुरगाणा : जिल्ह्यातील एनडीसी बँका पुर्ववत सुरू करून लाखो खातेदारांच्या खात्यात जमा असलेले कोट्यावधी रुपये परत देण्याची मागणी या बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमाजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांची निवेदनाद्वारे मागणी

सुरगाणा : जिल्ह्यातील एनडीसी बँका पुर्ववत सुरू करून लाखो खातेदारांच्या खात्यात जमा असलेले कोट्यावधी रुपये परत देण्याची मागणी या बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सुरगाणा शहरासह तालुक्यातील उंबरठाण, बाऱ्हे, बोरगाव याठिकाणी एनडीसी (जिल्हा बँक) बँकेत शेतकरी, नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच इतर खातेदारांच्या खात्यात कोट्यावधी रुपये नोटबंदीमुळे अडकून पडले आहेत. या बँकेतील व्यवहार कधीतरी सुरळीत चालू होतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र मोठा कालावधी उलटूनही व्यवहार सुरू झालेले नाहीत. त्यामुळे असंख्य खोतेधारकांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.जिल्हा बँकेच्या सुरगाणा, बाऱ्हे, उंबरठाण व बोरगाव येथील शाखांमध्ये तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, धान्य खरेदी महामंडळ, महिला बचत गट, बँक कर्मचारी, सर्व ग्रामपंचायतमधील नागरीक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी आदींच्या रकमा अडकल्या आहेत. ह्या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या बँकेच्या भोंगळ कारभारामुळे ही बँक बंद असल्यामुळे सन २०१५ - १६ पासून खातेदारांना निराशेने ग्रासले आहे. येत्या सात दिवसांत ठेवीदारांचे रुपये न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.याबाबतचे निवेदन एनडीसी बॅ॑केचे व्यवस्थापकीय संचालक, तहसिलदार, आमदार नितीन पवार, पोलिस ठाणे आदींना देण्यात आले आहे. या निवेदनावर अशोक आहेर, राजू पवार, नवसु गायकवाड, माधव पवार, तुकाराम देशमुख, रघुनाथ जाधव, मोहन गांगोडे यांचेसह अनेक खातेदारांची स्वाक्षरी आहेत.नोटबंदीनंतर गेल्या चार वर्षांपासून सर्व खातेदारांच्या खात्यात जमा असलेले त्यांचे कोट्यावधी रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या सात दिवसांत खातेदारांचे रुपये न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संपूर्णपणे जिल्हा बँक व प्रशासनाची राहील.- चिंतामण गावित, माजी उपाध्यक्ष, जिल्हा बँक.० सुरगाणा तालुक्यातील १९५ सेवानिवृत्त कर्मचारींचे एक कोटी बारा लाख रुपये अडकलेत.० नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाचे संपूर्ण जिल्ह्यात सव्वा सात कोटी रुपये अडकले आहेत.० शेतकरी व नोकरदार वर्गाचे तसेच इतर खातेदारांचे कोट्यावधी रुपये या जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये अडकलेले आहेत. 

टॅग्स :bankबँकtalukaतालुका